अवघ्या बारा तासात मोबाईल चोरीचा आरोपी पकडण्यात बल्लारशाह रेल्वे पोलीसांना यश







अवघ्या बारा तासात मोबाईल चोरीचा आरोपी पकडण्यात बल्लारशाह रेल्वे पोलीसांना यश

◾बल्लारशाह रेल्वेच्या ट्रेन मधून सहा मोबाईल चोरी 

बल्लारपुर ( राज्य रिपोर्टर ) : बल्लारशाह रेल्वे स्टेशन येथे दिनांक 24/02/24 रोजी अयोध्ये कडे जाणारी ट्रेन क्रमांक. 06154 आस्था एक्स्प्रेस ही रेल्वे स्टेशन बल्लारशाह  येथे प्लॅटफॉर्म नं 1 वर आली असता राञी 10.00 वाजता सदर ट्रेन मधून सहा मोबाईल चोरी गेले होते. 

ड्युटीवर असलेले जिआरपी चे पोलीस शिपाई पंकज भांगे व संदेश लोणारे यांनी आरपीएफ सब इन्स्पेक्टर प्रविण गाढवे व सिटी पवन कुमार यांचे मदतीने 12 तासात आरोपी  नामे अर्जुन संजय चांदेकर रा. थापर प्रायमरी स्कूल ओल्ड काॅलनी, बल्लारपूर पेपर मील समोर यास पकडून त्याचेवर भा द वी कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस हवालदार 240  वाघाचे करीत आहे.





Post a Comment

0 Comments