महिला बचत गटांतर्फे उत्पादित वस्तूंची प्रदर्शनी भावी महिला उद्योजकांसाठी मोठे मंच - आ. किशोर जोरगेवार

 








महिला बचत गटांतर्फे उत्पादित वस्तूंची प्रदर्शनी भावी महिला उद्योजकांसाठी मोठे मंच - आ. किशोर जोरगेवार

 ◾महिला बचत गटांतर्फे उत्पादित वस्तूंची प्रदर्शनी, आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते उद्घाटन

चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : महिला सक्षमीकरणासाठी केंद्र राज्य शासनामार्फत विविध योजना राबविण्यात येत आहेत. या योजना अधिक लोकाभिमुख करून महिलांना संघटित करून, प्रशिक्षण देऊन, आर्थिक सक्षमीकरण करणे, महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजना एकत्रितपणे एकाच छत्राखाली राबविण्यात यावेत यासाठी या योजना अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. खुशिया लोकसंचालित साधन केंद्राच्या वतीने  महिला बचत गटांतर्फे उत्पादीत वस्तूची प्रदर्शनी ही भावी महिला उद्योजगांसाठी मोठे मंच असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
     मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान महिला व बालविकास विभाग महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालय चंद्रपूर द्वारा संचालित खुशिया लोकसंचालित साधन केंद्राच्या वतीने ग्रामीण महिला बचत गटातर्फे उत्पादीत वस्तूची प्रदर्शनी चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा समन्वयक अधिकारी प्रदिप काढोळे, यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटिका वंदना हातगावकर, युवा नेते अमोल शेंडे, अल्पसंख्याक विभागाचे युथ शहर अध्यक्ष राशिद हुसेन, सायली येरणे, दुर्गा वैरागडे, आदिवासी विभागाचे जिल्हाध्यक्ष जितेश कुळमेथे, विश्वजीत शहा, उज्वला वरखडे, शारदा हुसे, नरेंद्र बनकर, राजकुमार बनकर, रुपेश शेंडे, आदी मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती.
  यावेळी पूढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले कि, मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान राज्यातील महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी राबविल्या जात असलेली योजना आहे. महिलांमध्ये आत्मविश्‍वास वाढवून त्यांचा उद्योजकीय विकास घडवून आणणे, त्यांना सातत्याने रोजगाराच्या संधी आणि बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचे काम सदर योजनेच्या माध्यमातुन केल्या जात आहे.    
   महिलांमध्ये कल्पकता असते.  महिला सशक्तीकरण करण्याचे आमचेही प्रयत्न सुरु आहे. महिलांना स्वयं रोजगारातुन आर्थिक प्रगती करता यावी या करिता यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने महिलांना निःशुल्क शिवणकाम प्रशिक्षण दिल्या जात असल्याचे यावेळी ते म्हणाले. ब्युटी पार्लर आणि मेकअप सारखे महागडे प्रशिक्षण आपण महिलांना निशुल्क उपलब्ध करुन देत आहोत. पाच हजार महिलांना प्रशिक्षीत करण्याचा संकल्प आपण केला असल्याचे ते यावेळी म्हणाले. या कार्यक्रमाला बचत गटाच्या महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. 





Post a Comment

0 Comments