आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते कोसारा येथील गुरु तेग बहादूर नगर मधील 45 लक्ष रुपयांच्या विकासकामाचे लोकार्पण

 






आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते कोसारा येथील गुरु तेग बहादूर नगर मधील 45 लक्ष रुपयांच्या विकासकामाचे लोकार्पण

   

चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : मौजा कोसारा गावातील गुरु तेग बहादूर नगर येथील 45 लक्ष रुपयातून करण्यात आलेल्या विकासकामांचे आज रविवारी आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले आहे. यात सभामंडप आणि संरक्षण भिंतीच्या कामासह इतर अनुषंगिक कामांचा समावेश आहे.
       यावेळी श्री गुरुद्वारा गुरु तेग बहादुर नगर चे अध्यक्ष सरदार बलदेव सिंग डल्लेकेचेअरमन सरदार जगतारसिंग गिलकार्याध्यक्ष सरदार राणापालसिंग डल्लेके आदींची प्रमूख अतिथी म्हणून तर ऑल इंडिया सिख सोशल वेलफेअर फेडरेशनचे अध्यक्ष सरदार हरविंदरसिंह धुन्नाजी यांची विशेष अतिथी म्हणून उपस्थिती होती.
  आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने मतदार संघात विविध विकासकामे केल्या जात आहे. त्यामुळे मतदार संघातील विकासकामांना गती आली आहे. ग्रामीण भागातही आमदार किशोर जोरगेवार यांनी मोठा निधी उपलब्ध करुन दिला असून सदर निधीतून विकासकामे केल्या जात आहे. सोबतच आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने सामाजिकधार्मिक आणि क्रिडा क्षेत्रातही मोठे काम केल्या जात आहे.
            दरम्यान मौजा कोसारा येथील श्री गुरु तेग बहादुर नगर येथे सभामंडप आणि संरक्षण भिंत बांधण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. सदर मागणीसाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी स्थानिक आमदार निधीतून 45 लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला होता. यातील 25 लक्ष रुपये खर्च करुन सभामंडपचे बांधकाम करण्यात आले तर 20 लक्ष रुपये खर्च करुन येथील संरक्षण भिंत व अनुषंगिक कामे पुर्ण करण्यात आली आहे.
            सदर सर्व कामाचे आज आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले. आपण केलेली मागणी पुर्ण करता आल्याचे समाधान आहे. या भागात आणखी विकासकामे करायची आहे. मतदार संघातील नागरिकांनी सुचविलेली कामे करण्यावर आमचा भर राहिला आहे. शहरी भागासह ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी मोठा निधी आपण खेचून आणला आहे. शिंदे - फडणविस सरकारही चंद्रपूर मतदार संघाच्या विकासासाठी सकारात्मक असून त्यांच्या सहकार्याने मोठा निधी या भागात उपलब्ध होत असल्याचे ते यावेळी म्हणाले या कार्यक्रमाला स्थानिक नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.





Post a Comment

0 Comments