संजय गांधी निराधार योजना समितीची बैठक संपन्न

 






संजय गांधी निराधार योजना समितीची बैठक संपन्न

◾130 प्रकरणांना मंजुरी

 बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : संजय गांधी निराधार अनुदान योजनेची  बैठक दि. 16 जानेवारी 2024 रोजी स्थानिक उपविभागीय अधिकारी कार्यालय, बल्लारपूर येथील सभागृहात संपन्न झाली. 

यावेळी सदर योजनेतील सुमारे 130 लाभार्थ्यांची प्रकरण मंजूर करण्यात आली. त्यात अपंग, निराधार, विधवा, परित्यगता, अविवाहित, दुर्धर आजाराने ग्रस्त रुग्ण, वृद्ध आदी प्रवर्गातील लाभार्थ्यांचा समावेश आहे. सदर लाभार्थ्यांना तात्काळ या योजनेचा लाभ मिळावा यासाठी पुढील कार्यवाही केली जात आहे. याप्रसंगी संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष श्री. समीर केने, सचिव तहसीलदार सौ.कांचन जगताप, नायब तहसीलदार फुलझले, सदस्य सौ. वैशालीताई जोशी, श्री. राजू दासरवार,श्री. किशोर मोहुर्ले, श्री. सतीश कानकम, श्री. मल्लेश कोडारी, श्री. रमेश पिपरे, रूमदेव डेरकर, अनिल मोरे यांच्या उपस्थितीत सभा संपन्न झाली.




Post a Comment

0 Comments