राजुरा शहरात विकसित भारत संकल्प यात्रा कार्यक्रम संपन्न

 




राजुरा शहरात विकसित भारत संकल्प यात्रा कार्यक्रम संपन्न

▪️ राजुरा नगर परिषद चा  उपक्रम

 ▪️ प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांना अनुदान चेक वाटप  

▪️ आदर्श कर दात्यांचा सत्कार 

राजुरा ( राज्य रिपोर्टर ) राकेश कलेगुरवार  : केंद्र शासन द्वारे पुरस्कृत विकसित भारत संकल्प यात्रेचे दिनांक 16.1.2024 रोजी राजुरा येथील स्वर्गीय कन्नमवार सभागृह येथे सकाळी आगमन झाले या संकल्प यात्रेचे स्वागत राजुरा नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. सुरज जाधव यांनी केले स्व. कन्नमवार सभागृहात आयोजित या कार्यक्रमात केंद्र व महाराष्ट्र शासन तर्फे गोरगरीब गरजू नागरिकांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती विविध स्टॉलच्या माध्यमातून नागरिकांना देण्यात आली. त्याचप्रमाणे आतापर्यंत देण्यात आलेल्या अनुदानाची व कामाचे संपूर्ण माहिती तसेच पात्र गरजूंना अनुदानाचे वाटप मुख्याधिकारी मा.डॉ. सुरज जाधव, डॉ. उमाकांत धोटे, नंदा गजभिये प्रोग्राम एक्झिक्युटिव्ह, संध्या किलनाके सीनियर इंजिनियर, आकाशवाणी चंद्रपूर दिनेश अडागले अहमदनगर, अक्षय सूर्यवंशी , अश्विनी कुमार भोई यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अनुदान चेक धनादेश वाटप बंडू मोहूर्ले 1,00,000 रुपये, अनु राजू टेकाम 40000 रुपये, अजित फातीमा अन्सारी 40000 रुपये, उषा बाबुराव शेळमाके 60000 रुपयांचे  करण्यात आले.

नगरपालिका क्षेत्रातील नागरिकां चा विकसित भारत यात्रेचे उपक्रमा ची माहिती हवी यासाठी शहरात दोन ठिकाणी कन्नमवार भवन व भारत लॉज समोर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नगर  परिषदेने राबवलेल्या या उपक्रमात राजुरा येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनुदानित लाभार्थी व उपस्थित नागरिकांना माननीय मुख्याधिकारी डॉ. सुरज जाधव व सुरेखा पटेल प्रकल्प अधिकारी, रांजित डाखरे प्रधानमंत्री आवास योजना प्रकल्प अभियंता यांनी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नगर परिषदेचे अक्षय सूर्यवंशी,अश्विनी कुमार भोई,आदित्य खापणे, प्रीतम खडसे,संजय जोशी ,वीरेंद्र धोटे,ओम प्रकाश गुंडावर, जयप्रकाश पांडे,हरीश पाटील, वंदना चींडाले,सरपटवार मॅडम, राकेश कलेगुरुवार, उपजिल्हा रुग्णालयाचे डहाळे सर ,मंथनवार आत्राम सर कुष्ठरोग विभाग,हंबर्डे सर मलेरिया विभाग,फारूक सर आधार केंद्र, आशिष वानखेडे उज्वल गॅस योजना,उषा मळावी आयसीडी, एल प स सोनारकर हत्तीरोग यासह नगरपालिकेच्या सर्व विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले याप्रसंगी आदर्श करदाते म्हणून मनोज उत्तरवार व  मेनू बेग यांच्या सत्कार करण्यात आला.




Post a Comment

0 Comments