मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी काढलेला मसुदा रद्द करा - ओबीसी समन्वय समिती





मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी काढलेला मसुदा रद्द करा - ओबीसी समन्वय समिती

बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : मराठा समाजचा पडद्याआडून ओबीसी मध्ये समावेश करण्याच्या  निषेधार्थ तहसीलदार साहेब  मार्फत मा.मुख्यमंत्री व  सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग  निवेदन तसेच पोस्टाने  31जानेवारी  ओबीसी समन्वय समिती बल्लारपूर व्दारे पावण्यात आले. 

संपूर्ण महाराष्ट्रात ओबीसी एल्गार यात्रा  निर्णयहि  यावेळी घेण्यात आला. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी काढलेला मसुदा रद्द करण्यात यावा. अस ठरावही यावेळी घेण्यातआला.

या बैठकीचे ठराव : महाराष्ट्र शासनाने मराठा आरक्षण संदर्भात सगे सोयरे या शब्दाची व्याख्या बदलवून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी काढलेला मसुदा हा मूळ ओबीसीवर अन्याय  अन्याय करणारा आहे. त्यामुळे 26 जानेवारी राजपत्राचा मसुदा रद्द करण्यात यावा.

न्या संदीप शिंदे समितीअसवैधानिक आहे. समितीच्या शिफारशीवरून मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा प्रमाणपत्र  वितरणालास्थगिती द्यावी.

मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी काढलेलामसुदा रद्द करण्यात यावा,असा ठरावही यावेळी करण्यात आला.

सरकारने 26 जानेवारी रोजी मनोज जरांगे यांच्याकडेसोपवलेल्या अध्यादेशाच्या मसुद्यामध्ये मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे ओबीसी समाजामध्ये भीतीचे वातावरण आहे. ओबीसी भटक्या- विमुक्त लेकरांचा तोंडचा घास काढून घेतला आहे. बहुसंख्य ओबीसी घटकावर आम्ही अन्याय होऊ देणार नाही. त्यासाठी वाटेल ते किंमत मोजू असा  निर्णय ओबीसी बांधवांनी घेतला.

निवेदन देताना ओबीसी समन्वय समितीचे अध्यक्ष विवेक  खुटेमाटे तसेच सुधीर कोरडे, कैशव थिपे,उमेश कडू,बुद्धशील बहादे,राजेश खेडेकर, जावेद खान, राजेंद्र खाडे,मनोहर माळेकर, विनायकराव साळवे, सूर्यकांत साळवे ,प्रभाकर कवलकर,मनोज वनकर,अभिलाष चुनारकर,हेमत मानकर,सचिन गावंडे विजय  दिकोंडावार,गोपाल टोगे,अशोक दंडलवर,निरांजने,सुभाष निबरड  आदि मोठ्या संख्येने ओबीसी बांधव उपस्थित होते.

यावेळी ओबीसी समन्वय समितीचे अध्यक्ष व म्हणाले सध्या सरकारकडून सध्या सरकारकडून ओबीसी समाजाला  फसविण्याचे काम सुरू आहे. सगे सोरे याची स्पष्ट व्याख्याया असताना बेकायदेशीर बदल केले जात आहे. ओबीसी समाजामध्ये मराठा समाजाला घेऊन ओबीसींना आरक्षणाच्या बाहेरच ढकलण्याचेकाम सुरू आहे. मराठा समाजाला वेळेवर आरक्षण देण्यास आमचा कुठलाही विरोध  नव्हता, पण आमच्या भटक्या विमुक्त ओबीसी बांधवांच्या लेकरांचा घास काढून घेतला जात  असल्याबद्दल आम्हि दुखी  आहोत. असे ओबीसी समन्वय समितीचे अध्यक्ष विवेक  खुटेमाटे बोलत होते.




Post a Comment

0 Comments