हंसराज अहीर यांना अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण

 






हंसराज अहीर यांना अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण

चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : पुण्यभूमी अयोध्यानगरीत दि. २२ जानेवारी २०२४ रोजी मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामजींच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत असून या स्वर्णीम, ऐतिहासिक सोहळ्याच्या निमंत्रणाचा मान मिळाल्याने अतिव आनंद झाला, जीवन कृतार्थ झाले.

या भव्यदीव्य प्राणप्रतिष्ठा सोहळ्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील तसेच लोकसभा मतदार क्षेत्रातील

नागरिकांमध्ये आनंद व उत्साहाचे वातावरण आहे. मला मिळालेल्या निमंत्रणाबद्दल सर्व संबंधित आदरणीयांचा कायम ऋणी राहील, अशा भावना राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी व्यक्त केल्या. सर्व श्रीराम भक्तांनी २२ तारखेला श्रीराम ज्योती प्रज्ज्वलित करून दीपोत्सव साजरा करावा असे आवाहनसुद्धा त्यांनी केले आहे.





Post a Comment

0 Comments