मनपाच्या जीर्ण झालेल्या शाळेचा जागेवर सोईसुविधा युक्त शाळेचे बांधकाम तात्काळ सुरू करा.

 






मनपाच्या जीर्ण झालेल्या शाळेचा जागेवर सोईसुविधा युक्त शाळेचे बांधकाम तात्काळ सुरू करा. 

◾आम आदमी पार्टी तथा युवा आघाडी चंद्रपूर तर्फे विद्यार्थी पालकांना सोबत घेऊन मनपासमोर आंदोलन.


चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : आम आदमी पार्टी महानगरपालिकेच्या शाळे संदर्भात नेहमी प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आलेली आहे. मागील वर्षी पार्टीच्या आंतरिक सर्वेक्षणात चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या डॉ. आंबेडकर शाळा, इंदिरानगर येथील शाळा डॉक्टर राजेंद्र प्रसाद शाळा, लोकमान्य टिळक शाळा या सर्व मनपाच्या शाळा खूप दयनीय अवस्थेत आढळल्या या संदर्भात महानगर पालिका आयुक्त यांना तात्काळ कार्यवाही करून शाळेचे पुन:निर्माण करण्यासंदर्भात निवेदन देण्यात आलेली होती. परंतु त्यावरती अजून पर्यंत नीधी उपलब्ध करून कार्यवाही न झाल्यामुळे  शाळेतील विद्यार्थी पालकामध्ये तीव्र नाराजी व रोष आहे ते सीसीटीव्ही कॅमेरे, सुरक्षा भिंत, स्वच्छ पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह इत्यादी वस्तूंचा अभाव असल्याची तक्रार आम आदमी पार्टी कडे वारंवार  करीत असतात.  हा विषय वारंवार मांडून सुद्धा प्रशासनाकडून ठोस पावले उचलली जात नसल्यामुळे व जनतेच्या टॅक्स चा पैसा गेट बनविने सौंदर्यीकरन अशा निरूपयोगी कामावर खर्च केल्या जात आहे. आज आम आदमी पार्टी तर्फे जिल्ह्याचे नेते सुनील मुसळे तथा जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांचा मार्गदर्शनात तथा युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे यांचा नेतृत्वात  पालक विद्यार्थ्यांना सोबत घेऊन पैदल मार्च आंदोलन करण्यात आले. 
जर 15 दिवसांत शाळे संदर्भात महत्वाचे पाऊल उचलले गेले नाही तर आम आदमी पार्टी विदयार्थी तथा पालकांना सोबत घेऊन उपोषणाला बसेल अशी माहिती राजु कुडे यांनी दिली.

यावेळेस आपचे नेते सुनील मुसळे, जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार, युवा जिल्हाध्यक्ष राजु कुडे, शहर अध्यक्ष योगेश गोखरें,जिल्हा संगठन मंत्री शंकर सरदार अरोरा,शहर संगठन मंत्री संतोष बोपचे, सामाजिक कार्यकर्ता मनीष राऊत, सिकंदर सागोरे , सुनिल सदभया,जिल्हा सचिव प्रशांत सिदुरकर,सह सचिव श्रीकांत मुन, ऍड. तबसुंम शेख, अनुप तेलतुंबडे, भिमराज बागेसर, सुजित चेटगुलवार,सुनिल भोयर, संगम सागोरे,क्रिश कपूर, स्वाती राऊत, प्रणाली रामटेके, प्रकाश शेंडे, आदित्य साव, विनीत तावाडे, प्रियांशु पोयाम, संजय कुंभारे, किरण राऊत,
 प्रतिज्ञा राजपाली, कोटांगले, उंदिरावाडे इत्यादी कार्यकर्ते पदाधिकारी आणि पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.




Post a Comment

0 Comments