सोशॅलिस्ट पार्टीची ' इंडिया' ला साथ







 सोशॅलिस्ट पार्टीची ' इंडिया' ला साथ

◾राष्ट्रीय सचिव किशोर पोतनवार यांची पत्रपरिषदेत माहिती

चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : आगामी निवडणुकांमध्ये सोशॅलिस्ट पार्टी निवडणुकांमध्ये कुठेही उमेदवार उभे करणार नाही. मात्र, आगामी निवडणुकांमध्ये आम्ही इंडिया आघाडीसोबत राहू अशी माहिती सोशॅलिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय महासचिव किशोर पोतनवार यांनी चंद्रपूर श्रमिक पत्रकार भवनात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात महागाई, बेरोजगारीच्या समस्या गंभीर होत असताना मोदी सरकार केवळ धार्मिकतेचे राजकारण करून देशातील नागरिकांची दिशाभूल करीत आहे. वेगवेगळे विषय उकरून काढून नागरिकांचे लक्ष महत्त्वाच्या विषयावरून दुसरीकडे वळविण्याचा प्रयत्न करीत असून, आगामी निवडणुकांमध्ये समाजवादी पार्टीचे पदाधिकारी भाजपाला सत्तेतून दूर करण्यासाठी इंडिया आघाडीसोबत उभे असतील असे ते म्हणाले. 

यावेळी त्यांनी संयुक्त राष्ट्र संघाला लोकतांत्रिक बनविण्यात यावे, तिबेटला सम्प्रभू राष्ट्राचा दर्जा देण्यात यावा, क्रीडा संचालन राजकीय नेत्यांच्या हाती न देता माजी खेळाडूंच्या नियंत्रणात असावे, समान शिक्षा व समान चिकित्सा प्रणाली लागू करण्यात यावी, ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्यात यावी, आदी मागण्याही सोशलिस्ट पार्टीने केल्या आहे. नुकतीच सोशॅलिस्ट पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक रायगड येथील युसूफ मेहरअली सेंटरमध्ये पार पडली. बैठकीला देशभरातील नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीत इंडिया आघाडीसोबत उभे राहण्याची निर्णय एकमताने घेण्यात आल्याचे पोतनवार यांनी चंद्रपुरात सांगितले. पत्रकार परिषदेला शेख मैकू शेख शहाबुद्दीन, यशोधरा पोतनवार, श्याम तिरपुडे, राजू काळे उपस्थित होते.




Post a Comment

0 Comments