जिल्हा कोषागार अधिकारी, चंद्रपूर पदाचा कार्यभार संजय व्ही. पडिशाला अप्पर कोषागार अधिकारी यांच्याकडे सुपूर्द

 





जिल्हा कोषागार अधिकारी, चंद्रपूर पदाचा कार्यभार संजय व्ही. पडिशाला अप्पर कोषागार अधिकारी यांच्याकडे सुपूर्द

 

चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : गडचिरोली येथील जिल्हा कोषागार अधिकारी श्री. लक्ष्मण लिंगालोड यांनी सहसंचालक, लेखा व कोषागारे,नागपूर यांच्या आदेशान्वये जिल्हा कोषागार अधिकारी, चंद्रपूर या पदाचा कार्यभार दि. 2 जानेवारी 2024 पासून चंद्रपूरचे अप्पर कोषागार अधिकारी श्री. संजय पडिशाला यांच्याकडे सोपविला आहे. त्यानिमित्य जिल्हा कोषागार कार्यालय,चंद्रपूर येथे समारोपीय कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात श्री. लिंगालोड यांनी कार्यालयातील सर्व सहकारी अधिकारी/कर्मचारी यांना मार्गदर्शन करतांना कोषागार कार्यालयामार्फत होणाऱ्या कामकाज नियोजित वेळेत कसे पुर्ण करता येईल, याकडे विशेष लक्ष दयावे, जेणेकरुन प्रशासनात कोषागार कार्यालयाबाबत आपुलकीची भावना निर्माण होईल.

श्री.पडीशााला यांनी पदाचा पदभार स्विकारतांना कार्यालयात सहकार्याच्या भावनेने कामकाज कसे करता येईल व कामात अचुकता कशी निर्माण करता येईल याबाबत मार्गदर्शन केले. व श्री. लिंगालोड कोषागार अधिकारी गडचिरोली यांना शाल व पुष्यगुच्छ देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

 सदर कार्यक्रमात श्री. अजयसिंह राठोड सहाय्यक लेखधिकारी, श्री. अनुपकुमार वाढई सहाय्यक लेखाधिकारी,  श्री.एस.आर. फुलझेले अप्पर कोषागार अधिकारी (DCPS) या अधिकऱ्यांनी विविध विषयावर आपले मनोगत व्यक्त केले, तर श्री. पंकज खनके सहायक लेखाधिकारी यांनी संचालन केले व आभार श्री.संदीप खापने लेखा लिपीक यांनी मानले. सदर कार्यक्रमांत जिल्हा कोषागार कार्यालयातील श्री.सय्यद, श्री. मिथीलेश सोनकांबळे, श्री. नन्नावरे व श्री कुलवे (उपलेखापाल) यासह इतर कर्मचारी उपस्थित होते.  




Post a Comment

0 Comments