कोठारी येथील ईदगाहच्या जमिनीचे निष्कासन आदेश खारीज करा - आबीद अली

 





कोठारी येथील  ईदगाहच्या जमिनीचे  निष्कासन आदेश खारीज करा - आबीद अली

 ◾येत्या ३१ जानेवारीला उपविभागीय कार्यालय येथे मुस्लिम समाजाचे धरणे आंदोलन

 बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : बल्लारपूर तालुक्यातील मौजा कोठारी येथे पुरातन काळातील सर्वे नं.२४ क्षेत्र ०.५२ हे. आर. जमीन शासकीय व गायरान असून  या जमिनीवर कोठारी परिसरातील  मुस्लिम समाज  वर्षातून दोनदा रमजान ईद, तसेच बकरी ईदची नमाज पठण करतात या ठिकाणी पूर्व काळातील  पूर्वजांनी  बांधकाम केलेले आहे गेल्या 70 ते 75 वर्षापासून  समाज त्याचा वापर धार्मिक विधीसाठी करीत आहे.

 भविष्यात या ठिकाणी सामाजिक सभागृह उर्दू घर  बांधकामाचा उद्देश असताना ग्रामपंचायत कोठारी यांनी ग्रामसभा व मासिक सभेद्वारे   मुस्लिम समाजाच्या धार्मिक विधी कार्यासाठी  ही जागा कायम करण्याचा प्रस्ताव  या ठिकाणी  दिला आहे. गावामध्ये  शांतता व सुव्यवस्था असून  स्थानिकांमध्ये  कोणताही वाद विवाद नसताना  तहसीलदार बल्लारपूर यांचे कार्यालयीन आदेश दि. १७/०४/२३ रोजी मौजा कोठारी येथील साजा क्र.८ जा. क्र. कावी/ प्रस्तुत१.२०२३/ जमीन अति. निष्का./७५९ नुसार अनधिकृत बांधकाम ईदगाह निष्कासन  करण्याचे आदेश दिल्यामुळे  मुस्लिम समाजामध्ये  असंतोष निर्माण झाला आहे. 

यामुळे कोठारी येथील जागेच्या वादावरून  तहसीलदारांचे दिलेले  निष्कासन आदेश  खारीज करण्यात  यावे व ही जागा  महसुली अभिलेखात नोंद करून ०.५२ आर. जमीन मुस्लिम समाजासाठी अधिकृत करण्यात यावी   याकरिता  कोठारी येथील मुस्लिम समाजाने उपविभागीय कार्यालय बल्लारपूर येथे  येत्या ३१ जानेवारीला धरणे आंदोलनाचा इशारा  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आबीद अली यांनी दिला त्यावेळी  सोहेल रजा- जिल्हा अल्पसंख्यांक काँग्रेस, अब्दुल करीम शहर अध्यक्ष  काँग्रेस बल्लारपूर,जमील शेख जिल्हाप्रमुख अल्पसंख्यांक,  चांद भाई शहराध्यक्ष भाजप चंद्रपूर, इर्शाद अली सय्यद, रियाज शेख, इरफान शेख, फिरोज खान, आसिफ अली सय्यद, आरिफ शेख, कलाम शेख, जावेद खान, राजिक पठाण, इमरान अली सय्यद, याकुब शेख व इतर  मोठ्या संख्येने उपस्थित होते.




Post a Comment

0 Comments