वैभव कॉन्व्हेंट स्कूलमध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

 




वैभव कॉन्व्हेंट स्कूलमध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

 बल्लारपुर ( राज्य रिपोर्टर ) : वैभव कॉन्व्हेंट स्कूल, बल्लारपूर येथे 3 जानेवारी रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.

 या कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष श्री. हेमंत मानकर, संस्थेचे सचिव आदरणीय श्रीमती. रझिया खान मॅडम, शाळेच्या संचालिका माननीय सुरेखा पाण्डेय (मिश्रा) मॅडम, शाळेचे मुख्याध्यापक  विजय शिंदे सर, शाळा व्यवस्थापन समिती ची सदस्या आदरणीय फरजाना शेख मैडम,आदरणीय पालक, सर्व शिक्षक व विद्यार्थी प्रामुख्याने उपस्थित होते.

 या कार्यक्रमा निमित्त विद्यार्थिनींनी सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा परिधान करून सर्व उपस्थिताना बालिका दिनाच्या शुभेच्छा दिल्या.  समाजात योगदान देणाऱ्या यशस्वी भारतीय महिलांच्या भूमिका विद्यार्थिनींनी सादर करून स्वत:ची ओळख करून दिली.

शाळेच्या संचालिका  सुरेखा मिश्रा (पाण्डेय) मैडम यांनी  स्त्री शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगितले.शाळेचे मुख्याध्यापक श्री. विजय शिंदे सर यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनाचा परिचय करून दिला.शिक्षिका वैशाली तिरपुडे यांनी माता सावित्री यांच्या जीवनावर आधारित गीत सादर केले.

 यावेळी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी समाजप्रबोधनासाठी प्रभातफेरीचे आयोजन केले होते.विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

 "मी सावित्रीबाई फुले बोलत आहेत" ही सुंदर कविता शिक्षिका वनिता रंगारी यांनी वाचली.

  कार्यक्रमाचे संचालन शिक्षिका शबाना शेख मॅडम व शिल्पा देशभ्रतार मॅडम यांनी केले तर आभार शिक्षिका अश्विनी मसाडे मॅडम यांनी मानले.अशा प्रकारे हा कार्यक्रम यशस्वी झाला.




Post a Comment

0 Comments