जनता कनिष्ठ महाविद्यालय, घुग्घुस येथे साजरा करण्यात आला भुगोल दिन

 






जनता कनिष्ठ महाविद्यालय, घुग्घुस येथे साजरा करण्यात आला  भुगोल दिन

 चंद्रपूर/घुग्घुस ( राज्य रिपोर्टर ) : चांदा शिक्षण प्रसारक मंडळ,चंद्रपूर द्वारा संचालित जनता कनिष्ठ महाविद्यालय,घुग्घुस येथे आज दिनांक 16 जानेवारी 2024 रोज मंगळवारला भूगोल दिनाचे औचित्य साधून 'भूगोल दिन' कार्यक्रम निमित्ताने वर्ग 11 वी व 12 वी भूगोल विषयाच्या विद्यार्थ्यांच्या वतीने  भूगोल प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जनता कनिष्ठ महाविद्यालयाचे आदरणीय मा. प्राचार्य श्री.व्ही.टी. पोले सर तर प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाच्या उप प्राचार्या मा.अनघा पालपत्तुवार मॅडम व कनिष्ठ महाविद्यालयाचे पाळी प्रमुख मा. श्री.अरविंदजी  आसुटकर सर,सांस्कृतिक विभाग प्रमुख मा. श्री.विशालजी नगराळे सर यांनी उपस्थिती दर्शविली.

 या कार्यक्रमाची सुरुवात पाहुण्यांच्या स्वागताचे करण्यात आली. त्यानंतर भूगोल विषय विभाग प्रमुख प्रा.श्री.प्रदीप वासाडे यांनी आजच्या भूगोल दिनाविषयी आपल्या प्रस्ताविकेतून माहिती दिली.

भूगोल दिनाचे महत्त्व, भूगोल दिन का साजरा केला जातो,कोणाच्या जन्मदिवसानिमित्ताने साजरा केला जातो,भूगोल विषयाचे महत्त्व, भूगोल विषयाचे प्रकार,विद्यार्थ्यांना भूगोल विषयाबाबत रुची कशी निर्माण करता येते याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. पाहुण्यांनी या कार्यक्रमानिमित्ताने आपले मनोगत व्यक्त केले. महाविद्यालयाचे मा. प्राचार्य श्री.पोले सर यांनी आपल्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना प्रत्येक उपक्रमात आनंदाने सहभागी होऊन आपला सर्वागीण विकास साधावा व अशा प्रकारचे अभिनव उपक्रम महाविद्यालयात घेण्यात यावे याबाबत मार्गदर्शन केले.  त्यानंतर पाहुण्यांनी विद्यार्थ्यांकडून आयोजित करण्यात आलेल्या भूगोल प्रदर्शनीची पाहणी करून विद्यार्थ्यांचे कौतुक केले. या भूगोल प्रदर्शनीच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना आपल्या कलागुणांचा आविष्कार करण्याची संधी मिळाली त्याबद्दल विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले. या भूगोल प्रदर्शनीचा आनंद महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी घेतला.                     

           या भूगोल दिन व  प्रदर्शनीच्या आयोजनाकरिता कनिष्ठ महाविद्यालयाचे जेष्ठ प्रा.मा. श्री. विजयजी चलाख सर, मा.प्रा.श्री.ज्ञानेश्वरजी सोनकुसरे सर,प्रा.श्री.ईश्वरजी खंगार सर, प्रा.श्री.हेमंतजी बुटले सर,प्रा.श्री. संतोषजी सूर सर ,प्रा.श्री. नामदेवजी मोरे सर, प्रा. श्री.सचिनजी भोयर सर प्रा.श्री.संजयजी चोखारे सर,प्रा.श्री.सदानंदजी बोधाने सर प्रा.धनपालजी पिंपळकर सर,तर विशेष सहकार्य वर्ग 11वी भूगोल वर्गाचे वर्गशिक्षक प्रा. श्री. नरेश बूच्चे सर व वर्ग 12 वी भूगोल वर्गाचे वर्गशिक्षक प्रा. श्री .अनिलजी  ठाकरे सर यांनी केले.तसेच महाविद्यालयाच्या सर्व जेष्ठ प्प्राध्यापिका मा.सरिता नंदूरकर मॅडम,प्रा.मंजुषा कुचनकर मॅडम,प्रा. वैशाली सदावर्ती मॅडम,प्रा.योगिता कष्टी मॅडम,प्रा.घरामी मॅडम, प्रा.वडस्कर मॅडम व इतर शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे योगदान लाभले. व अशाप्रकारे भूगोल दिन यशस्वीरित्या पार पडला.




Post a Comment

0 Comments