क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त नि:शुल्क रोग निदान व उपचार शिबिराची आयोजन बल्लारपूर येथे 7 जानेवारीला

 







क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त नि:शुल्क रोग निदान व उपचार शिबिराची आयोजन बल्लारपूर येथे 7 जानेवारीला  

◾मा.ना.श्री.सुधीरभाऊ मुनगंटीवार मंत्री,वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय ( म.रा.), पालकमंत्री, चंद्रपूर वर्धा 

बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : बल्लारपूर शहर तालुक्याचे ग्रामीण भागातील गरजू व्यक्तींना आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याचा सामाजिक उपक्रम राबविण्यात जात आहे. 

मा.ना.श्री.सुधीरभाऊ मुनगंटीवार मंत्री,वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय ( म.रा. ) पालकमंत्री, चंद्रपूर व वर्धा तथा दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था, संचालित आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, सावंगी (/मेघे) यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त नि:शुल्क रोग निदान व उपचार शिबिराची रविवार रोजी दिनांक 7/01/2024, रुग्ण नोंदणी वेळ :- 9:00 ते दु.2:00 वाजेपर्यंत, शिबिराचे स्थळ :-  महात्मा गांधी विद्यालय,जुना बस स्टॉप, बल्लारपूर   



 बल्लारपूर येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्र परिषदेत बल्लारपूर येथील मोफत रोग निदान व उपचार शिबिराची माहिती देताना चंदनसिंग चंदेल म्हणाले,  ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून  गरजू  आरोग्य सेवा सुलभ उपलब्ध व्हावी म्हणून बल्लारपूर तालुका ग्रामीण भागात   ग्रामपंचायत 31 सर्व एकत्र जनाकडे रुग्णाचे शिबिर पूर्व नोंदणी करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे त्याप्रमाणे  बल्लारपूर  येथील भाजपाचे कार्यालयात व शरीरातील 30 नोंदणीचे स्थळ भाजपाचे कार्यकर्ते रुग्णाचे शिबिर पूर्ण नोंदणी करून तज्ञ डॉक्टरांकडून रुग्णाची तपासणी करून उपचारासाठी मदत करणार आहे. अशी माहिती भाजपचे ज्येष्ठ नेते चंदनसिंग चंदेल माजी अध्यक्ष वन विकास महामंडळ यांनी दिली.

 क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त नि:शुल्क रोग निदान व उपचार  शिबिरात पुढील आजाराची तपासणी व उपचार केल्या जाईल

 मेडिसिन तज्ञ :- रक्तदाब, ब्लड शुगर, बरेच दिवसाच्या ताप, किडनीचे आजार, हृदयरोग, अशक्तपणा, वारंवार चक्कर येणे इत्यादी.

 नेत्र रोग तज्ञ :- डोळ्यांचे सर्व गंभीर आजार, मोत्याबिंदू  शास्त्रीयक्रिया, तिरळेपणा.

 सर्जरी तज्ञ :- हायड्रोसिल, हर्निया, अंगावरील गाठी,औआतड्याचे आजार, मुतखड्याचे आजार, पोट्याचे आजार, गलगंड ( थायरॉईड ) इत्यादी.

 स्त्रीरोग तज्ञ :- मासिक पाळीचे आजार, पांढरे पाणी जाणे, महिलेचे आजार इत्यादी. 

बालरोग तज्ञ :-  हृदयाला छिद्र, मतिमंद मुलाच्या विकासासंबंधी तसेच कुपोषण, लहान मुलांचे सर्व आजार.

 कान नाक घसा तज्ञ :- कान नाक घश्याचे सर्व आजार.

 अस्थिरोग तज्ञ :-  संधिवात, मणक्यात असणारी गॅप, वाकलेले पाय, फ्रॅक्चर तसेच हंडाचे सर्व आजार.

त्वचारोग तज्ञ :- खाज, गचकरण, अंगावरील पांढरे डाग, त्वचेचे विविध आजार.

 श्वासन रोग तज्ञ : - दमा, बरेच दिवसाचा खोकला, तोंडावाटे पडणारे रक्ताचे ठसे इत्यादी.

 हृदयरोग तज्ञ :- जुनाट हृदयरोग,  छातीत दुखणे, धाप लागणे, छातीत धडधडणे इत्यादी.

 मानसिक रोग :- सर्व प्रकारचे मानसिक आजार.

 दंत व मुखरोग :- दातांचे विविध आजार, दुभंगलेले ओठ, दुबमलेले टाळूचे आजार.

 युरो तज्ञ :- किडनी संबंधित जुने आजार, किडनी व प्रोटेस्टन्स संबंधित आजार, मुतखड्याचे आजार.

 न्यूरो तज्ञ :- मेंदू संबंधित विविध आजार, मिरगी येणे/ झटके येणे इत्यादी.

शिबिरात आजारी चे तपासणी व उपचार केल्या जाईल.  मोफत रोग निदान व उपचार शिबिर मोफत उपचार केले जाणार या शिबिरात 60 तज्ञ डॉक्टर कडून तपासणी केली जाणार आहे. 120 वैद्यकीय अधिकारी कर्मचारी रुग्णांच्या विविध आजारांवर उपचार तपासणी करून गरजू शास्त्रज्ञ भरती करण्यात येत येऊन मोफत उपचार देखील केली जाणार आहे.

 ज्या रुग्णांनी पूर्व नोंदणी केली नाही असाानी सोबत आधार नोंदणी कार्ड वा शिधापत्रिका घेऊन यावे या शिबिराचा लाभ घ्यावे असे  भाजपाचे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष हरीश शर्मा यांनी सांगितले.

 गरीब व गरजू रुग्णांना सर्व प्रकारचे तपासण्या देखील मोफत केल्या जाणार आहे.ज्या रुग्णांना भरतीसाठी वाहन सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यास संधीचा लाभ बल्लारपूर शहर व ग्रामीण भागातील नागरिकांनी घ्यावा असे निलेश खरबडे यांनी सांगितले.

यावेळी चंदनसिंग चंदेल, भाजपा ग्रामीण जिल्हा अध्यक्ष हरीश शर्मा, शहराध्यक्ष काशिनाथ सिंग, सचिव मनीष पांडे, निलेश खरबडे, ऑड.रणजय सिंग, समीर केने, श्रीकांत आंबेकर, घनश्याम बुरडकर, श्रीनिवास कंदकुरी, आशिष चावडा व कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.





Post a Comment

0 Comments