क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची 193 वी जयंती निमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोज

 




क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची 193 वी जयंती निमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोज

◾महात्मा ज्योतिबा फुले ( हिंदी, उर्दू,तेलुगू ) विद्यालय, बल्लारपूर

बल्लारपुर ( राज्य रिपोर्टर ) : बुधवार दिनांक 03/01/2024 ला महात्मा ज्योतिबा फुले ( हिंदी, उर्दू,तेलुगू ) विद्यालय, बल्लारपूर येथे थोर समाजसेविका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची 193 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. 

त्यानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक श्री.मकसूद सर यांच्या मार्गदर्शनाखाली विध्यार्थ्यांची मोठी प्रभातफेरी काढण्यात आली. ही प्रभातफेरी फुले भवन येथून सावित्रीबाई फुले सभागृह येथे नेण्यात आली. तिथे सावित्रीबाईच्या प्रतिमेला माल्यार्पण करून, परत ती फुले भवन येथे आणण्यात आली,सावित्रीबाईंच्या जीवनावर आधारीत विविध कार्यक्रम विध्यार्थ्यांनकडून साजरे करण्यात आले. 

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष ऍड श्री. जयंत साळवे,संस्था सचिव श्री. सुभाष ताजने सर तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष  शाळेचे मुख्याध्यापक श्री. मकसूद अहमद सर प्रामुख्याने उपस्थित होते,तर प्रमुख वक्ते म्हणून गुरनानक विज्ञान महाविद्यालयाच्या प्राध्यापिका श्रीमती. दुधे मॅडम उपस्थित होत्या. शाळेचे पर्यवेक्षक श्री. प्रकाश सर, श्री.रवी अनसुरी सर यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष प्रयत्न केले, तर  हिंदी, उर्दू,तेलुगू या तिन्हही माध्यमातील पारी प्रमुख आणि शिक्षकांनी तसेच शिक्षककेत्तर कर्मचारी आणि शाळेतील विध्यार्थ्यांनी मिळून हा कार्यक्रम यशस्वी केला. 

या कार्यक्रमाचे संचालन श्रीमती. रजनी केशकर मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीमती. हेमलता मॅडमने केलें.




Post a Comment

0 Comments