यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने मतदार नोंदणी शिबिराचे आयोजन

 









यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने मतदार नोंदणी शिबिराचे आयोजन  

11 ठिकाणी होणार शिबिरनागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहण

 

चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) :  आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने शहरातील विविध 11 ठिकाणी मतदार नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आज गुरुवार पासून सदर शिबिराला सुरवात झाली असून सकाळी 11 ते वाजेपर्यंत नवीन मतदारांना येथे नोंदणी करता येणार आहे. या शिबिराचा नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घेण्याचे आवाहण यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने करण्यात आले आहे.
      1 जानेवारी 2024 पर्यंत 18 वर्ष पुर्ण होणार असलेल्या युवकांना मतदार यादीत नाव समाविष्ट करुण घेण्यासाठी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने चंद्रपूर शहरातील विविध 11 ठिकाणी मतदार नोंदणी शिबीर आयोजित केल्या केल्या गेली आहे. आज गुरुवार पासून या शिबिरांना सुरवात झाली असून डिसेंबर पर्यंत सदर शिबीर चालणार आहे. यात जैन भवन जवळील यंग चांदा ब्रिगेडचे जनसंपर्क कार्यालयघुटकाळा येथील नेहरु विद्यालयजलनगरदाताळा शहरपडोलीवडगाव येथील धनोजे कुणबी सभागृहजनता महाविद्यालयतुकुम येथील मातोश्री विद्यालयराष्ट्रवादी नगर येथील राधाकृष्ण सभागृहबंगाली कँम्पबाबुपेठ येथील सावित्रीबाई फुले विद्यालय या ठिकाणी सदर शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत.






Post a Comment

0 Comments