'स्त्री मुक्ती परिषदे' साठी चंद्रपुरातून जाणार लाखो महिला

 








'स्त्री मुक्ती परिषदे' साठी चंद्रपुरातून जाणार लाखो महिला

◾वंबआ महिला आघाडीची पत्रकार परिषदेत माहिती

चंद्रपूर  ( राज्य रिपोर्टर ) : नागपूर येथील कस्तुरचंद पार्कवर २५ डिसेंबर रोजी होणाऱ्या स्त्री मुक्ती परिषदेसाठी राज्यभरातून महिला येणार असून, चंद्रपुरातील पंधराही तालुक्यातून लाखो महिला या परिषदेत सहभागी होणार असल्याची माहिती वंचित बहुजन महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष कविता गौरकर यांनी शनिवारी चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

मनुस्मृतीत येथील कोट्यवधी निरपराध, निर्दोष, दलित, आदिवासी, बहुजन जमातीतील स्त्रीयांना शूद्र, अतिशुद्राचा दर्जा देण्यात आला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २५ डिसेंबर १९२७ रोजी महाड येथे मनुस्मृतीचे दहण करून या विषमतावादी व्यवस्थेला तिलांजली दिली होती. तेव्हापासून मनुस्मृती दहण दिवस राज्यात आयोजित करण्यात येतो. याच पार्श्वभूमीवर मनुस्मृती दहण दिनानिमित्त नागपूर येथील कस्तुरचंद पार्कवर स्त्री मुक्ती परिषद आयोजित करण्यात आली आहे. वबंआचे राष्ट्रीय नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनात आयोजित परिषदेला वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. नीशा शेंडे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य कुशल मेश्राम, माजी राज्यमंत्री डॉ. रमेशकुमार गजबे, पूर्व विदर्भ संयोजक अरविंद सांदेकर आदींची प्रामुख्याने उपस्थिती राहणार आहे.

या परिषदेसाठी चंद्रपूर जिल्ह्यातील पंधराही तालुक्यातून मोठ्या संख्येने महिला जाणार आहे. यासाठी नियोजन करण्यात आले असून, महिलांनी मोठा संख्येने या परिषदेत सहभागी व्हावे असे आवाहन कविता गौरकर यांनी पत्रकार परिषदेत केले. यावेळी जिल्हा महासचिव अल्का मोटघरे, जिल्हा संघटक करुणा जीवने, जिल्हा प्रवक्ता नीशा ठेंगरे, ललिता गेडाम, प्रतिभा तेलतुंबडे, ज्येष्ठ सल्लागार लता साव, पुष्पलता कोटांगले, अविता उके आदी उपस्थित होते.




Post a Comment

0 Comments