क्षुल्लक कारणावरून पत्नीचा खून ; भिसी येथील घटना

 










क्षुल्लक कारणावरून पत्नीचा खून ; भिसी येथील घटना 

चिमूर ( राज्य रिपोर्टर  ) : प्रभाग क्रमांक 17, आखर चौक भिसी येथील रहिवासी असलेल्या सोमेश्वर संभाजी बानकर ( वय - अंदाजे 45 ) याचे पत्नीशी क्षुल्लक कारणावरून भांडण झाले. रागाच्या भरात पत्नीच्या डोक्यात दगड घालून सोमेश्वरने पत्नीचा खून केला.ही घटना शनिवारी सकाळी चार ते सहा वाजताच्या दरम्यान घडली.मृतक पत्नीचे नाव शीतल उर्फ करुणा सोमेश्वर बानकर ( वय - 30 ) आहे.

        सोमेश्वर व शीतल यांना सात व दोन वर्षाच्या दोन मुली आहेत. फिर्यादी निवृत्ती रामाजी शेंडे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीस तत्काळ ताब्यात घेतले. मृतकाच्या प्रेताचे शवविच्छेदन चिमूर उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आले.भिसीचे ठाणेदार प्रकाश राऊत घटनेचा पुढील तपास करीत आहेत.




Post a Comment

0 Comments