'हिट ॲण्ड रन कायदा २०२३' विरोधात आज निषेध रॅली

 









'हिट ॲण्ड रन कायदा २०२३' विरोधात आज निषेध रॅली


चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : पूर्वीच्या हिट ॲण्ड रन कायद्यात सुधारणा करून नवीन हिट ॲण्ड रन कायदा २०२३ गृहमंत्री अमित शहा यांनी आणला आहे. हा कायदा देशभरातील वाहनचालकांसाठी अन्यायकारक असून, लहानमोठ्या अपघातात वाहनचालक भरडले जाणार आहे. अनेकदा वाहनचालकांनी चुकी नसतानाही अपघात होतात. मात्र, अशावेळी मोठ्या वाहनचालकांना दोषी ठरविले जाते. नवीन कायद्यामध्ये मोठ्या शिक्षेची आणि दंडाची तरतूद करण्यात आल्याने हा कायदा रद्द यावा या मागणीसाठी अनैशा वाहन चालक कामगार संघटनेच्या वतीने शनिवार ३० डिसेंबर रोजी गांधी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निषेध रॅली काढण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे सूरज उपरे यांनी चंद्रपूर श्रमिक पत्रकार भवनात आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे.

यापूर्वी अपघातातील दोषींना शिक्षा देण्यासाठी विविध कलमे अस्तित्वात आहे. शिवाय मोटार वाहन कायदा अस्तित्वात आहे. असे असतानाही सुधारित हिट ॲण्ड रन कायद्यात नव्याने कलम ३०२ म्हणजे हत्येचे कलम समाविष्ट करण्यात आले आहे. नव्या कायद्यानुसार १० वर्ष कारावासाची शिक्षा, २ लाख ते १० लाख रुपयेपर्यंत दंड अशी तरतूद करून हा कायदा २० डिसेंबर २०२३ रोजी संसदेत पारीत करण्यात आला आहे. अनेक अपघात अचानक झालेले असतात. अशोवळी मोठ्या वाहनाचे वाहनचालक नाहक भरडले जातात. त्यामुळे हा कायदा रद्द करण्याची मागणी आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचे उपरे यांनी सांगितले. देशाच्या अर्थव्यवस्थेत वाहनचालकांचा मोठा वाटा असताना त्यांच्यावर अन्यायकरणारे कायदे खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा यावेळी देण्यात आला. या निषेध रॅलीत वाहनचालकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहनही त्यांनी केले. पत्रकार परिषदेला अनंता रामटेके, ज्ञानेश्वर गोखरे उपस्थित होते.




Post a Comment

0 Comments