बेघर निराश्रित नागरिकांना दिलासा

 









बेघर निराश्रित नागरिकांना दिलासा

◾शरणमं बहुउद्देशिय सामाजिक संस्थेतर्फे ब्लँकेट वितरण


चंद्रपुर ( राज्य रिपोर्टर ) :  दरवर्षी प्रमाणे यंदाही शरणमं बहुउद्देशिय सामाजिक विकास संस्था चंद्रपूर तर्फे बेघर निराश्रित रात्री फूटपाथ वर थंडीत कुडकुडत झोपणाऱ्या नागरिकांना कडाक्याच्या थंडीपासून संरक्षण व्हावे या हेतूने मागील काही दिवसांपासून ब्लँकेट चे वाटप करण्यात येत आहे, आठवडाभरा पासून थंडीचा जोर वाढला आहे, वातावरणातील बदलामुळे ताप सर्दी खोकल्याचे रुग्णांचे प्रमाण वाढत चालले आहे, कडाक्याच्या थंडीचा सामना करीत फूटपाथ वर झोपणाऱ्या निराधार बेघर निराश्रित नागरिकांना कडाक्याच्या थंडीपासून बचाव व्हावा या उद्देशाने शरणम बहुउद्देशिय सामाजिक विकास संस्था चंद्रपूर तर्फे दरवर्षी हिवाळ्यात ब्लँकेटचे वितरण करण्यात येते,अनेक गरजू नागरिकांना याचा लाभ मिळाला असून तापमानात वाढ होईपर्यंत सदर उपक्रम राबविला जाईल असे संस्थेचे अध्यक्ष श्री. शेखर तावाडे यांनी कळविले आहे.





Post a Comment

0 Comments