बालकाच्या पालकांनी सात दिवसाच्
◾ अन्यथा दत्तक मुक्त घोषित करणार
चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : महिला विकास मंडळ द्वारा संचालित किलबिल प्राथमिक बालगृह दत्तक संस्था, चंद्रपूर येथील आदित्य नावाच्या बालकाला दत्तकमुक्त घोषित करण्यात येणार असून त्याच्या संबंधित पालकांनी सात दिवसांच्या आत बालकाबाबत आपला हक्क दाखविण्याचे आवाहन जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर यांनी केले आहे.
राजुरा येथे वर्धा नदी पुलीया रोड येथे कर्तव्यावर हजर असणारे होमगार्ड कर्मचारी यांना वर्धा नदीपुलाजवळ रोडच्या उजव्या बाजुला एक वर्षाचे लहान बालक आढळून आले. सदर बालकाच्या अंगात लाल रंगाचा हाफ टी-शर्ट व कमरेला पांढरा रुमाल गुंडाळलेला होता. राजुरा पोलीस स्टेशनमार्फत सदर बालकास संगोपनाकरीता महिला विकास मंडळद्वारा संचालित, किलबिल प्राथमिक बालगृह दत्तक संस्था येथे दाखल केले. संस्थेने त्या बालकाचे नाव आदित्य असे नोंदवून त्या बालकाला महिला विकास मंडळ द्वारा संचालित, किलबिल प्राथमिक बालगृह दत्तक योजना, चंद्रपूर येथे दाखल करण्यात आले.
संबंधित बालकाच्या पालकांनी सात
0 Comments