आम आदमी पक्षातर्फे ईव्हीएम हटाओ देश बचाव हस्ताक्षर मोहिम

 










आम आदमी पक्षातर्फे ईव्हीएम हटाओ देश बचाव हस्ताक्षर मोहिम


बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) :  नुकतेच 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर पुन्हा एकदा देशभरात ईव्हीएम बाबत शंका उपस्थित केल्या जात आहेत. याचे पडसाद बल्लारपूर शहरातही बघायला मिळत आहे. आम आदमी पक्षाने शहराध्यक्ष रविकुमार पुप्पलवार यांच्या नेतृत्वात शहरातील नवीन बस स्थानक जवळ मंगळवार दि.12/12/2023 पासून ईव्हीएम विरोधात सिग्नेचर मोहिम राबविली. या मोहिमेत आज 174 लोकांनी ईव्हीएम विरोधात स्वाक्षरी करून आपला सहभाग नोंदविला. या मोहिमेच्या दरम्यान ईव्हीएम मशीनच्या विश्वासार्हतेबद्दल जनतेने देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केला. 

या मोहिमेसोबतच पक्षाने सदस्यता अभियान देखील राबविले ज्यामध्ये मंगळवार रोजी 21 लोकांनी पक्षाचे सदस्यत्व स्विकारले. ईव्हीएम बद्दल बोलतांना शहराध्यक्ष रविकुमार पुप्पलवार यांनी म्हटले सत्तेचा दुरुपयोग करून  ईव्हीएम मध्ये फेरफार करून ठिकठिकाणी सत्ता हस्तगत करत आहे. 

जे आपल्या लोकशाहीसाठी घातक आहे. म्हणून "ईव्हीएम हटाओ देश बचाओ" मोहिमेअंतर्गत जनतेची स्वाक्षरी असलेले निवेदन राष्ट्रपती व निवडणूक आयोग यांना पाठविले जाणार आहे. यानंतरही जर निवडणूकीत ईव्हीएम मशीन बंद केले गेले नाही तर त्याविरोधात जनहित याचिका देखील दाखील केली जाईल अशी माहिती त्यांनी दिली. या मोहिमेत जिल्हा संघठन मंत्री नागेश्वर गंडलेवार,  शहर उपाध्यक्ष अफजल अली, सचिव ज्योतीताई बाबरे, प्रवक्ता आसिफ हुसेन शेख,  महिला उपाध्यक्ष सलमा सिद्दीकी तसेच इतर कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी सहभाग नोंदविला.



Post a Comment

0 Comments