जल जीवन मिशनच्या जल जागृतीसाठी निबंध, चित्रकला व वकृत्व स्पर्धेचे आयोजन.










जल जीवन मिशनच्या जल जागृतीसाठी निबंध, चित्रकला व वकृत्व स्पर्धेचे आयोजन.

◾जल जीवन मिशन अंतर्गत गावातील प्रत्येक घरात नळाव्दारे पाणी


निबंध स्पर्धेचे विषय

1.पाउस पाणी      

   संकलन

2.पाणी अडवा पाणी     

   जीरवा

3.जल हेच जीवन

4. माझ्या गावातील   

    पाणी पुरवठा

5. जल जीवन मिशन   

    व माझ्या गावाचा  

     विकास.

6. जल संवर्धन    

    काळाची गरज.

वेळ 40 मीनीटे.

रोख पारीतोषीक

शालेय स्तरावरुन प्रथम व्दीतीय व तृतीय क्रमांक प्राप्त विघ्यार्थी तालुकास्तरावर एकत्रीत करुन तालुकास्तरावर 1 ते 3 क्रमांक निवडले जातील. तालुकास्तरावरुन प्राप्त स्पर्धकांमधुन प्रथम व्दीतीय व तृतीय क्रमांक घोषीत केले जाणार आहेत

प्रथम    21000/- रोख

व्दीतीय 11000/- रोख

तृतीय   5500/ रोख.

जिल्हास्तरावर रोख बक्षीत देउन गौरविण्यात येईल.


चंद्रपुर ( राज्य रिपोर्टर ) जल जीवन मिशनच्या प्रभावी प्रचार प्रसिध्दीसाठी व विघ्यार्थ्यांमध्ये पिण्याचे पाणी व जलसंवर्धन याविषयी जलजागृती व्हावी यासाठी शालेय, माध्यमीक, उच्च माध्यमीक स्तरावर निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा तसेच वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहीती जिल्हा परिषदेचे मुख्य  कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी दिली आहे.

महाविघालयीन वकृत्व स्पर्धा


1.पाउस पाणी संकलन

2. पाणी अडवा पाणी  जीरवा

3.जल हेच जीवन

4. माझ्या गावातील पाणी 

    पुरवठा

5. पाण्याचे स्त्रोत  

   बळकटीकरण.

6. पाण्याचे सुयोग्य वितरण    

    व देखभाल दुरुस्ती.

7. जल संवर्धन

चित्रकला स्पर्धेचे विषय

1.पाउस पाणी संकलन

2. पाणी अडवा पाणी       

    जीरवा.

3.जल हेच जीवन

4. माझ्या गावातील   

    पाणी पुरवठा.

5. जल संवर्धन व    

    पाण्याचे महत्व व

6. पाण्याचे वितरण व    

    करप्रणाली.

7. पाणी पुरवठा    

    योजनेतील    

    लोकसहभाग.

8. पाणी पुरवठा

    योजनेची देखभाल    

     दुरुस्ती.

 वेळ 2 तास .

 

          जल जीवन मिशन अंतर्गत हर घर जल से नल या प्रमाणे गावातील प्रत्येक कुटुंबाला प्रति व्यक्ती , प्रतिदिन 55 लिटर शुध्द पाण्याचा पुरवठा करणे हा उदेश आहे. ग्रामस्थांनां पीण्याचे पाणी , पाणी पुरवठा योजना, योजनेमध्ये लोकसहभाग ,पाणी पुरवठा योजना कार्यान्वीत झाल्यानंतर योजनेची देखभाल तसेच योजना कार्यान्वीत झाल्यानंतर योजनेची देखभाल तसेच योजना  शाश्वत राहण्यासाठी पाणी पटटी वसुली व स्त्रोत बळकटीकरणासाठी जल संवर्धनाचे महत्व विघ्यार्थी दशेपासुनच रुजावे व त्यांच्यात जलजागृती व्हावी यासाठी या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

          जल शक्ती मंत्रालय भारत सरकार व  पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग महाराष्ट्र शासन यांचे संयुक्त विघमाने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

          प्राथमीक व माध्यमीक अशा दोन गटांत स्पर्धा आयोजीत करण्यात आल्या आहेत.जिल्हयातील सर्व प्राथमीक , माध्यमीक , उच्च माध्यमीक  शाळा तसेच महाविघालयीन स्तरावर पंचायत समिती स्तरावर स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेकरीता विघ्यार्थ्यांनी आप आपल्या शाळेमध्ये कींवा गट विकास  अधिकारी यांचे कडे संपर्क साधावा.


          विघ्यार्थ्यांनी या स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवावा असे आवाहन , जल जीवन मिशन प्रकल्प संचालक , नुतन सावंत यांनी केले .




Post a Comment

0 Comments