दोन दिवसीय कठिनचिवरदान पुण्यउत्सव वर्षावास समापनदिन साजरा

  










दोन दिवसीय कठिनचिवरदान पुण्यउत्सव  वर्षावास समापनदिन साजरा

बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : महाबोधी दि लाॕर्ड  बुध्दा फाउंडेशन द्वारा डॉ.आंबेडकरभवन जवळ, डॉ.आंबेडकर वार्ड येथे परमपावन कार्तिक पौर्णिमेला दोन दिवसीय वर्षावास समापनदिन साजरा करण्यात आला.

भिख्खूनी खेमा थेरी,व सद्धम्मा भिख्खूनी यांच्या मंगलमय उपस्थितीत दि.२७/११/२०२२ ला सायं.५:०० वा बुध्दवंदना-परित्राण-धम्मोपदेश कठिन चिवरदान करण्यात आले.व २८/११/२०२३ ला सायं.७:००वा  रूपचंद घोनमोडे यांचे हस्ते डॉ.आंबेडकर पुतळ्याला माल्यार्पन करून सामुहिक भोजनदान सुरू झाले. येणा-या बुध्दजयंतीला- मे २०२४ला " निशुल्क सामुहिक मंगल परिणय सोहळा " घेण्यात येईल.नवदांपत्यास गॅस सिलेंडर भेटवस्तू देण्याचा अधिष्ठान महाबोधी बुध्दा फाउंडेशनचे संस्थापकअध्यक्ष मनोज उमरे यांनी केला.

विविध सामाजिक समस्यांना हात घालून सर्वसामान्य परिवाराला दिलासा देण्याचा महाबोधी बुध्दा फाउंडेशनचा सतत ध्यास असतो.

यावेळी कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी बड्डा भोगले,बंटी शिंदे,आशिष चिवंडे,पवन सोंडवले, कुमार तुरकर,सुशील शिंदे, सपना आघात,समिक्षा सातपुते इ.कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.





Post a Comment

0 Comments