संविधान जनजागृती सप्ताहाचे आयोजन आजपासून

 









संविधान जनजागृती सप्ताहाचे आयोजन आजपासून

◾महात्मा ज्योतिबा फुले तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार संवर्धन समितीचे चंद्रपूरचे आयोजन

 ◾१९ ते २५ नोव्हेंबर या कालावधीत जिल्ह्यातील सात तालुक्यात हा कार्यक्रम

चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर )महात्मा ज्योतिबा फुले तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार संवर्धन समिती चंद्रपूरच्या वतीने संविधान सन्मान दिनानिमित्त संविधान जनजागृती सप्ताह आयोजित करण्यात आला असून, १९ ते २५ नोव्हेंबर या कालावधीत जिल्ह्यातील सात तालुक्यात हा कार्यक्रम घेण्यात येणार असल्याची माहिती समितीचे सचिव दिलीप वावरे यांनी चंद्रपूर श्रमिक पत्रकार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

या सप्ताहअंतर्गत सावली, पोंभुर्णा, बल्लारपूर, चिमूर, भद्रावती, कोरपना आणि चंद्रपूर येथे संविधान प्रस्ताविका आणि संविधान पुस्तिकेचे वाटप नागरिकांना करण्यात येणार आहे. मुख्य कार्यक्रम २४ नोव्हेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह वडगाव चंद्रपूर येथे होणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन विधानपरिषद आमदार सुधाकर अडबाले यांच्या हस्ते होणार असून, अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष विजय उमरे राहणार आहेत. यावेळी सेवानिवृत्त आयएएस अधिकारी ई. झेड. खोब्रागडे, प्रा. डॉ. श्रीकांत भोवते, प्रितम बुलकुंडे, कार्याध्यक्ष राजू खोब्रागडे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. तर संध्याकाळी ७.३० वाजता वाशिम येथील चेतन सेवांकुर प्रस्तुत अंध मुलांचा आंबेडकराइट ऑफ हॉलीवूड धम्मा डे धमाल हा आर्केस्ट्रा सादर करण्यात येणार असल्याचे वावरे यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला गोकरण खोब्रागडे, अशोक देवगडे, चेतन उंदीरवाडे, रमेश रामटेके, तुकाराम देशपांडे, शाम दामले, प्रमोद कांबळे उपस्थित होते.





Post a Comment

0 Comments