गावाची बदनामी करणाऱ्यांना लावणार लगाम

 









गावाची बदनामी करणाऱ्यांना लावणार लगाम

◾वहाणगांवात पार पडली ऐतीहासीक ग्राम सभा


चिमूर ( राज्य रिपोर्टर ) : चिमूर तालूक्यातील वहाणगांव हे दारूबंदीच्या कारकीर्दीपासून प्रसिद्ध आहे . या गावात शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख श्री. प्रशांत कोल्हे यांची एक हाती सत्ता मागील सन २०१० पासून असून अनेक विषयांमूळे हे गांव चर्चेचा विषय असतो .

         याच गावातील अवैद्य व्यावसायीकाचे काळे धंदे यांना मोठ्या प्रमाणात तेथील सरपंच यांनी आळा घातल्याने त्यांचे विषयी सुडभावना निर्माण झाली. व त्यांच्या साथीला गावातील काही राजकीय विरोधक, वैयक्तीक विरोधक एकवटून सोशल मिडीयावर वहाणगांव व तेथील सरपंच जातीयवादी आहे. अशा प्रकारचे अनेक आरोप करत आहे.

         त्यामूळे आयोजीत ग्राम सभेत हा विषय चर्चेचा बनला व ग्रामस्थांनी या देशात राहून देश विरोधी कृत्य करणे म्हणजे देशद्रोह होतो. मग गावात राहून गाव विरोधी कृत्य करणे गावद्रोह का नाही ? असा सवाल केला.

        त्या विषयाला अनूसरुन सभेत उपस्थित लोकांनी यापुढे आमच्या गावाची बदनामी करनारे गावातील किंवा बाहेरचे यांना आता नक्कीच धडा शिकवू . जो गावातील नागरीक आहे. त्याचे काही प्रश्न समस्या असतील तर त्यांनी रीतसर मांडावे . गावातील आरोप कर्त्यांना सरपंच यांनी आव्हान करीत संधी दिली. परंतु सभेत कोणताही विरोधक फिरकला नाही  हे विषेश ग्रामसभा ही सार्वभौम असून गावाच्या हितासाठी जो निर्णय घ्यावा लागेल तो घेवू . असे एकमताने ठरवीले .

या सभेला शेकडो लोकांची वहाण गावांत पहील्यादांच ऐतिहासिक गर्दी बघायला मिळाली .





Post a Comment

0 Comments