आमदार किशोर जोरगेवार यांनी अम्मा का टिफिन परिवारासह दिवाळी केली साजरी

 












आमदार किशोर जोरगेवार यांनी अम्मा का टिफिन परिवारासह दिवाळी केली साजरी

 ◾स्नेहमिलन व आरोग्य शिबिर कार्यक्रमाचे आयोजन

 

चंद्रपुर ( राज्य रिपोर्टर ) : आज पासुन दिवाळीला सुरवात झाली आहे. दिवाळीच्या पहिल्याच दिवशी अम्मा का टिफिन परिवारासोबत दीपावली स्नेहमिलन व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अम्माचा टिफिन परिवारातील सदस्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

 यावेळी आमदार किशोर जोरगेवार, गंगुबाई उर्फ अम्मा जोरगेवार, कल्याणी किशोर जोरगेवारवैद्यकीय अधिकारी डॉ. सोनल आश्राम, डॉ. विवेक देशमुख, डॉ. आदित्य मेहेत्रे, डॉ. दर्शनी मेश्रामयंग चांदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटिका वंदना हातगावकरबंगाली समाज महिला शहर प्रमुख सविता दंढारेसायली येरणेकौसर खानभाग्यश्री हांडेशमा काजीवैशाली मेश्रामवैशाली मद्दीवारआशा देशमुखअस्मिता डोणारकरमाला पेंदामकल्पना शिंदेविमल काटकरसोनाली आंबेकरदुर्गा वैरागडेस्मिता वैद्यअनिता झाडेवंदना हजारेचंदा ईटनकर आदींची उपस्थिती होती.

   ‘राहो न कोणी उपाशी अम्मा का टिफिन येई घराशी’ असा संकल्प करत आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने अम्मा का टिफिन उपक्रम सुरु करण्यात आला आहे. सदर उपक्रमा अंतर्गत अत्यंत गरजू व्यक्तीला घरपोच जेवणाचा डब्बा पोहचविला जात आहे. आज या परिवातील सदस्यांसोबत आमदार किशोर जोरगेवार यांनी दिवाळी साजरी केली.

  यावेळी दीपावली स्नेहमिलन आणि आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रक्तदाबमधुमेह व इतर वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्यात. यावेळी नि:शुल्क औषधोपचार करण्यात आला. आमदार किशोर जोरगेवार यांनी अम्मा टिफिन परिवारातील सदस्यांची भेट घेत त्यांना दिवाळी निमित्त फराळ व भेट वस्तू देत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्यात. अम्मा का टिफिन हा उपक्रम यशस्वी करण्यामागे अनेकांचे परिश्रम आहे. याच परिश्रमामुळे खंड न पडता आपण नियमित हा उपक्रम सुरु ठेवू शकलो. आता हा परिवार मोठा झाला आहे. त्यामुळे आपल्या जबाबदा-याही वाढल्या आहेत. या परिवारातील प्रत्येक सदस्य आमच्यासाठी महत्वाचा असुन त्यांना येणा-या अडचणी सोडविण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहूयेथील सदस्यांच्या आरोग्याकडे आपण विशेष लक्ष देत आहोत. आज आपल्यासह दिवाळी साजरी करतांना आनंद होत असल्याचे यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले. या कार्यक्रमात यंग चांदा ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.






Post a Comment

0 Comments