शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळेल - उदय सामंत

 




शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळेल - उदय सामंत

◾काँग्रेस नेते दिनेश चोखारे यांनी मुंबई येथे उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन चर्चा

चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : जिल्ह्यातील लॉयड्स मेंटल स्पेन आर्यन अँड पॉवर कंपनीने आपल्या विस्तारीकरणासाठी अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित केल्या आहेत. या जमिनींचे मोबदला शेतकऱ्यांना कवडीमोल भाव देण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्या आहेत. या संदर्भात चंद्रपूरचे काँग्रेस नेते दिनेश चोखारे यांनी मुंबई येथे उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना योग्य न्याय मिळेल असे आश्वासन दिले.

मंत्री सामंत म्हणाले की, कंपनीची सखोल चौकशी केली जाईल. चौकशीतून जे काही तथ्य समोर येतील त्यानुसार योग्य कारवाई केली जाईल. शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळेल याची खात्री करून घेऊ, असे त्यांनी सांगितले.

चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कंपनीकडून मिळालेला मोबदला कमी असल्याचा आरोप केला आहे. कंपनीने त्यांना कवडीमोल भाव दिला आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.

उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनावर शेतकऱ्यांनी विश्वास ठेवला आहे. कंपनीची चौकशी करून योग्य कारवाई होईल अशी त्यांना आशा आहे.








Post a Comment

0 Comments