समाजकंठका कडून वहानगावासह सरपंचाचीही नाहक बदनामी

 










समाजकंठका कडून वहानगावासह सरपंचाचीही नाहक बदनामी 

◾ कायदेशीर कारवाईच्या मागणीचे गावकऱ्यांचे निवेदन

चिमूर ( राज्य रिपोर्टर ) : चिमूर तालुक्यातील वहानगाव येथे सर्व जाती धर्माचे नागरीक गुण्या गोंविदाने राहत आहेत.तरीही व्ययक्तीक द्वेशाने काही सामाजीक संघटनाना पुढे करून सरंपच प्रशांत कोल्हे हे जातीयवादी असल्याचे वक्तव्य समाजकंटका मार्फत समाज माध्यम तथा पत्रकां मार्फत सतत प्रसारीत केल्या जात असल्याने सरपंचासह गावाचीही नाहक बदनामी होत असल्याने अशांवर कार्यवाही करण्याची मागणी वहानगाव वासीयांनी उप विभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातुन केली आहे.

         वहानगाव ग्रामपंचायत सरपंच प्रशांत कोल्ह यांनी २०१० ते २०२० पर्यंत उपसरपंच म्हणुन आपल्या कामाची छाप सोडली. २०२१ पासुन सरपंच म्हणुन गावाचे नेतृत्व करीत आहेत. गावकर्‍यांना विश्वासात घेऊन कामे करतात.अवैध दारूविक्री, व्ययक्तिक अतिक्रमण,स्वस्त धान्य दुकानाचे गैर प्रकार उघडीस आनल्याने संबधित व्यक्तीच्या मनात त्यांचे विषयी सुडभावना निर्माण झालेली आहे.संबधित व्यक्ती गावातील राजकीय विरोधक तथा सामाजीक संघटनाना हाताशी घेऊन समाज माध्यमावर गावाची व सरपंच हे अन्याय करणारे व जातीवादी आहेत . आदिवासी समाजावर अन्याय करणारे आहेत म्हणून सतत वक्तव्य प्रसारीत करीत असतात. वहानगांवात गोंड, माना, बौद्ध,शिख धर्मीय व ओबीसी नागरीक असताना जातीयवाद तथा  धर्मवाद नाही.

        परंतु ज्यांचे अवैध व्यवसाय बंद झाले,श्रम करून जे लोक ज्यांचा समाजाशी व इतर समाजातील घटकांशी काहीही संबंध नसतांना उपजीविका पूर्ण करू शकत नाही असे लोक आमच्या गावचे सरपंच व आमच्या वहानगांव गावाचे नाव घेऊन सतत नाहक बदनामी करीत असतात.त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन त्यांच्या आरोपाप्रमाणे आमचं गांव किंवा आमच्या गावचे सरपंच दोषी असेल तर आम्हास व सरपंचास पाठीशी घालू नये.जर का ते दोषी नसतील तर सात दिवसाच्या आत संबधितावर कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी उप विभागीय पोलिस अधिकारी, उपविभागीय अधिकाऱ्या मार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनावर सह्या केलेल्या १४० नागरीकांच्या वतीने दिलेल्या निवेदनातून केली आहे.





Post a Comment

0 Comments