ग्रामीण भागाचा सर्वसमावेशक विकास करण्याचा आमचा संकल्प - आ. किशोर जोरगेवार

 









ग्रामीण भागाचा सर्वसमावेशक विकास करण्याचा आमचा संकल्प - आ. किशोर जोरगेवार  

◾सिदुर येथील विविध विकासकामांचे आमदार जोरगेवार यांच्या हस्ते भुमिपूजन


 चंद्रपुर ( राज्य रिपोर्टर ) : ग्रामीण भागाच्या विकासासाठी मोठा निधी आपण उपलब्ध करुन दिला आहे. या निधीतून येथील विकासकामांना गती मिळाली आहे. सिदुर येथील विकासासाठी आपण जवळपास अडीच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. मतदार संघातील ग्रामीण भागाचा सर्वसमावेशक विकास करण्यासाचा आमचा संकल्प असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

   सामाजिक न्याय विभागाच्या 30 लक्ष रुपयांच्या निधीतून सिदुर येथील विकासकामांचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते भुमिपूजन करण्यात आले. यावेळी सिदुरच्या सरपंच्या मंजुषा मत्तेउपसरपंच संजय गणफाडेयंग चांदा ब्रिगेडचे ग्रामीण तालुका अध्यक्ष राकेश पिंपळकरमुन्ना जोगीयंग चांदा ब्रिगेडचे युवा नेते अमोल शेंडेअल्पसंख्यांक विभागाचे युथ शहर अध्यक्ष राशेद हुसेननकुल वासमवारकरणसिंह बैसकार्तिक बोरेवारराजेंद्र कांबडेपंढरी निमसटकरमाया निमसटकरगोविंदा मोडककालीचरण कांबळीरमेश शेलवटेसुनिल मासीरकरबंडू मासिरकरप्रियंका शेलवटेआशिष मासिलकरहरिष वाटेकरचंदा नांदेकर आदींची उपस्थिती होती.
   यावेळी पूढे बोलताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले किशहराच्या विकासामध्ये ग्रामीण भागाचे मोठे योगदान राहिले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी आपण ग्रामीण भागाला शहराशी जोडणा-या प्रमुख मार्गासाठी मोठा निधी उपलब्ध करुन दिला आहे. लवकरच सदर कामांना सुरवात होणार आहे. सिदुर येथील विकास कामांसाठीही आपण जवळपास अडिच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. या निधीतून येथील विकासकामांना गती मिळाली आहे. आज येथे 30 लक्ष रुपयांच्या निधीतून सौंदर्यीकरणसह ईतर विकास कामे केल्या जाणार आहे. आताच बोरवेल आणि पांदण रस्त्याची मागणी करण्यात आली आहे. आपली ही मागणीही रास्त असून यासाठी लवकरच निधी उपलब्ध करुन देणार असल्याचे यावेळी ते म्हणाले.
    आज या कामाचे भुमिपूजन पार पडले आहे. आता हे काम उत्तम दर्जाचे होईल यासाठी गावक-यांनी लक्ष ठेवावे. सदर काम वेळेत पूर्ण करुन ते लोकार्पित झाले पाहिजे यासाठी आपले प्रयत्न राहणार असल्याचे ते यावेळी म्हणाले. या कार्यक्रमाला ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.





Post a Comment

0 Comments