भव्य जिल्हास्तरीय पुरूष व महिला कबड्डी सामने आज पासून

 










भव्य जिल्हास्तरीय पुरूष व महिला कबड्डी सामने आज पासून   

◾आ.मा. सुधीरभाऊ मुनगंटीवार फॅन्स क्लब यांच्या संयुक्त उपक्रम  

बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : स्व.डॉ. सच्चीदानंद मुनगंटीवार यांच्या जयंती निमित्त बल्लारपूर येथील दादाभाई नौरोजी फॅक्टरी मैदानावर बालाजी वार्डात आज दि. १७ ते १९ नोव्हेंबर दर्म्यान पुरुष आणि महिला कबड्डी सामने हौसी जिल्हा कबड्डी असोसिएशन आणि सुधीरभाऊ फॅन्स क्लब यांच्या संयुक्तपणे सामने आयोजीत करण्यात येत आहे.

या सामने मधे पुरूष गटात प्रथम पुरस्कार रू.२००००/-, व्दितीय पुरस्कार रू. १५०००/- आणि महिला गटात प्रथम पुरस्कार रू.१२०००/- आणि व्दितीय पुरस्कार रू. ७०००/- अश्या प्रमाण राहणार आहे. भव्य जिल्हा स्तरीय कबड्डी सामने मॅट वर घेण्यात येणार आहे.

जिल्हा स्तरीय कबड्डी सामने यशस्वीतेसाठी सुधीर भाऊ फॅन्स क्लब च्ये अध्यक्ष श्रीकांत आंबेकर, उपाध्यक्ष सुधाकर सिक्का आणि आकाश चौधरी, सचिव शशीकांत मुंडे, कोषाध्यक्ष कमल वर्मा आणि विनोद कोवे आदि पदाधिकारी प्रयासरत आहे .






Post a Comment

0 Comments