तिसरी रेल्वे लाईनमुळे नागरिकांच्या समस्या वाढल्या

 




तिसरी रेल्वे लाईनमुळे नागरिकांच्या समस्या वाढल्या

 ◾वर्धा ते बल्लारशाहा येणारी तिसरी रेल्वे लाईन मुळे ताडाळीसह मोरवा, येरुर, पडोली,  येथील नागरिकांना समस्या

चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : चंद्रपूर जिल्ह्यातील ताडाली गावातील नागरिकांना वर्धा ते बल्लारशाहा येणारी तिसरी रेल्वे लाईनमुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. रेल्वे लाईनमुळे ताडाली गावातील मुख्य रस्ता कायमस्वरूपी बंद होणार असल्याचे रेल्वे विभागाकडून कळविण्यात आले आहे. यामुळे ताडाळीसह मोरवा, येरुर, पडोली, येथील ग्रामवासी संभ्रमात आहेत. या बाबत काँग्रेस नेते दिनेश चोखारे यांनी निवेदन दिले आहे.
ताडाली गावातील लोकसंख्या ६५०० पेक्षा जास्त आहे. गावात प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा परिषद शाळा, शासकीय कार्यालये, बँकेची कार्यालये, अनेक औद्यौगिक कारखाने आहे आणि शेतकरी मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे रहदारी खूप जास्त असते. रेल्वे लाईनमुळे मुख्य रस्ता बंद झाल्यास ग्रामस्थांना येण्या-जाण्यासाठी मोठी समस्या निर्माण होईल.
याशिवाय, रेल्वे लाईनसाठी मोठ्या प्रमाणात शेती, घरे आणि प्लट भूसंपादन करण्यात आले आहे. परंतु काही भूधारकांना आर्थिक मोबदला मिळत नसल्याचे तक्रारी आहेत. तसेच, भूसंपादित जागेचा ताबा देण्यासाठी रेल्वे विभागाने अल्प वेळ दिला आहे. त्यामुळे ग्रामस्थांना राहता घराचे ताबा कसे काय घेऊ शकतात, अशी चिंता व्यक्त केली जात आहे.
या संदर्भात दिनेश चोखारे यांनी रेल्वे विभागाकडे निवेदन दिले आहे. त्यांनी रेल्वे लाईनमुळे निर्माण झालेल्या समस्या सोडविण्याची मागणी केली आहे. रेल्वे विभागाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, "ताडाली गावातील मुख्य रस्ता कायमस्वरूपी बंद होऊ नये. यासाठी ओव्हर ब्रिज बांधण्यात यावा. आणि संतगतीने सुरु असलेले काम त्वरित पूर्ण करून ग्रामस्थांना सहकार्य करावे. तसेच, भूसंपादित भूखंडधारकांना योग्य मोबदला मिळावा आणि त्यांना ताबा देण्यात यावा."
या निवेदनाची दखल घेऊन रेल्वे विभागाने समस्या सोडविण्याची कार्यवाही करावी, अशी अपेक्षा आहे.






Post a Comment

0 Comments