माता महाकालीच्या पालखी दर्शनासाठी उसळला भक्तीचा महासागर

  



माता महाकालीच्या पालखी दर्शनासाठी उसळला भक्तीचा महासागर

◾नगरप्रदक्षिणा पालखीने पाच दिवशीय महोत्सवाचा समारोप



चंद्रपुर ( राज्य रिपोर्टर  ) : श्री महाकाली माता महोत्सव समितीच्या वतीने आयोजित पाच दिवसीय श्री माता महाकाली महोत्सवाचा समारोप झाला आहे. यावेळी निघालेल्या माता महाकालीच्या पालखी दर्शनासाठी मार्गावर भक्तीचा महासागर उसळला होता. या नगरप्रदक्षिनेत  सादर करण्यात आलेल्या विविध देखाव्यांनी चंद्रपूरकरांचे लक्ष वेधून घेतले.
     सायंकाळी पाच वाजता महाकाली मंदिर जवळून नगरप्रदक्षिणा पालखीला सुरवात झाली. तत्पूर्वी चार दिवस महाकाली मंदिर जवळील पटांगणात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेयात धार्मीकसामाजिकसांस्कृतीक कार्यक्रमांचा समावेश होता. सदर कार्यक्रम पाहण्यासाठीही मातेच्या भक्तांची मोठी गर्दी केली होती. या दरम्यान हजार 999 कन्यांचे कन्यापूजन आणि कन्याभोजन करण्यात आले. तर 11 हजार 111 दिवे प्रज्वलीत करत परिसर लखलख करण्यात आला. नवरात्रो दरम्यान जन्मलेल्या कन्यांच्या पालकांना महोत्सव समीतीच्या वतीने चांदिचे नाणे देण्यात आले.
  तर 23 आॅक्टोंबरला सायंकाळी पाच वजात श्री माता महाकाली नगरप्रदक्षिणा पालखीला प्रारंभ झाला. यात  या पालखी यात्रेत मंदिर अब बनने लगा है या गाण्याची सुप्रसिध्द गायीका ईशरत जॅहा यांच्या रोड शो ने शोभायोत रंगत भरली. सोबतच यात केदारनाथ धाम येथील झांज व डमरु पथकपवनसुत हनुमान व वानरसेनाकानपूर येथील शिवतांडव व अघोरी नृत्यउत्तर प्रदेश राज्यातील काली माता दृष्यआदिवासी नृत्यगंगा आरतीपालखीत तुतारी व अब्दारीचा समावेशपालखीत पोतराजे नृत्य यांचा समावेश,चंद्रपूर शहरातील ८० वादकांचा जगदंब व अन्य ढोल ताशा व ध्वज पथकांचा समावेशशहरातील बँड पथकांचा समावेशपालखीत गायत्री मंदिर परिवारातील ५०० कलशधारी महिलांचा समावेशपालखीत ५०० महिला व पुरुषांचे लेझीम पथकडी. जे. धुमालचे विविध संचशाळाकॉलेज मधील विद्यार्थी- विद्याथ्र्याचे दृष्य समूहडी. जे. चे विविध संचमहिलापुरुषांचे दांडिया गरबा नृत्य समूह१००९ महिला - पुरुषांचे योग नृत्य१५१ मंडळांचे महिला - पुरुषांचे भजन समूहनागपूर येथील विरांगण क्रीडा गृपच्या मुलांचे शस्त्र प्रात्यक्षिकशहरातील अनेक सामाजिक संघटनांचा पालखीत सहभागशहरातील व्यायाम शाळांचा पालखीत सहभागछत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारित दृष्य समूह,  चंद्रपूर जिल्ह्यातील देवी - देवतांच्या मंदिराचे दृष्यश्री माता निर्मला परमेश्वरी भक्तांचा पालखीत समावेश,पारंपरिक खेळांचे पालखीत दृष्यतेलगु समाजाचे बतुकम्मा दृष्यपारंपारिक सण उत्सवांचे बोलके दृष्यशहारातील तंट्या बिल व वाघोबांचा समावेशमशाल पथक यांचा पालखीत समावेशटांगता रोप मल्लखांब प्रात्यक्षिक समूह,  स्थिर मल्लखांब प्रात्यक्षिक समूहजोगदंड महाराज वारकरी शिक्षण संस्थापंढरपूर यांचे १०८ वारकरी टाळमृदुंगगर्जना समुह,स्वच्छता समूह यांचा पालखीत समावेश,बंगाली समाजातील महिलांद्वारा शंखनाद व पुरुषांद्वारा डंकनाद आदींचा समावेश होता.

 


गंगा आरतीने वेधले लक्ष

नगरप्रदक्षिणा यात्रेत वाराणसीहून सहभागी झालेल्या पंडीतांनी गंगा आरती केली. यावेळी करण्यात आलेल्या गंगा आरतीने भाविकांचे लक्ष वेधून घेतले. गंगा आरती पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी गंगा आरतीमुळे धार्मीक वातावरण निर्माण झाले.


 
महोत्सवात लाभलेला लोकसहभाग उत्साह वाढविणारा - आ. किशोर जोरगेवार


 चंद्रपूरची आराध्य दैवत माता महाकालीचा जागर करण्यासाठीमहिला शक्तीला सन्मानित करण्यासाठी सोबतच चंद्रपूरातील पर्यटनाला चालना मिळावी या हेतुने आपण अयोजित केलेला श्री माता महाकाली महोत्सव चंद्रपूरकरांच्या प्रचंड प्रतिसादामूळे भव्यतेसह यशस्वी झाला आहे. महोत्सवाच्या या पाच दिवस आपण हजारोच्या संख्येने नोंदविलेला लक्षणीय सहभाग उत्साह वाढविणारा असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे.
   श्री महाकाली माता महोत्सव समितीच्या वितीने आयोजित श्री माता महाकाली महोत्सवाचे भव्य अशा  नगरप्रदक्षिणा पालखीने समारोप करण्यात आला आहे. यावेळी सदर भावना आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केली आहे. ते म्हणाले किमागच्या वर्षी प्रथम वर्ष होता. मात्र त्यावेळी चंद्रपूकरांच्या लाभलेल्या सहभामुळेच आपण दुस-या वर्षीही हे आयोजन भव्यतेसह करु शकलो. आपल्या सहभागाशिवाय हा महोत्सव शक्य नव्हता. पूढच्या वर्षीही हाच उत्साह घेन आपण हा महोत्सव आयोजित करु आता हि पंरपरा बनली असून दरवर्षी नवरात्रोमध्ये मातेची पालखी निघणार असा विश्वास त्यांनी यावेळी बोलुन दाखविला. या आयोजनासाठी सहकार्य करणा-या सर्व सेवाभावी संस्थाकार्यकर्तेमाता भक्तांचेही त्यांनी यावेळी आभार मानले.

      पाच दिवस चाललेल्या कार्यक्रमात निशा बोनगीरवार - पडगीलवारजयश्री कापसे - गांवडे यांनी मंचाची व्यवस्था उत्तमरित्या सांभाडली तर अल्का ठाकरेश्याम हेडासुक्षणा गायकवाडज्योती गावंडेमृणालीनी खाडीलकररजनी पाॅलसुमेधा श्रीरामेस्वप्नील मेश्रामधन्वरषा नागोसेसरोज चांदेकरएकता पित्तुलवारअर्चना चौधरीजगदीश नंदुरकरप्रज्ञा जिवणकरराजश्री मार्कंडेवारश्री झामकसुदधनंजय तावाडे आदींची संचालन केले.  





Post a Comment

0 Comments