महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय, बल्लारपूर येथे गरबा नृत्याचे आयोजन

 



महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय, बल्लारपूर येथे गरबा नृत्याचे आयोजन 


 बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : दिनांक 18 ऑक्टोंबर  2023 ला शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय , बल्लारपूर येथे सांस्कृतिक विभागातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही गरबा नृत्याचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बादलशहा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले .

 कार्यक्रमाची सुरुवात माता सरस्वतीच्या फोटोला माल्यार्पण करून करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण प्रमुख प्रा. डॉ. बालमुकुंद कायरकर , प्रमुख अतिथी सौ अरुणा राजूरकर समाजसेविका ,  प्रा.सतीश कर्णासे , प्रा. मोहितकर, आशिष मुडेवार आणि सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.सौ शुभांगी भेंडे शर्मा उपस्थित होते.

गरबा समूह एकल नृत्यात महाविद्यालयातील सर्व वर्गांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. बक्षीस वितरणाचा कार्यक्रम प्रभारी प्राचार्य डॉ. बादलशहा चव्हाण, सौ अरुणा राजुरकर, आशिष मुडेवार, प्रा. मोहितकर , प्रा. शुभांगी भेंडे शर्मा यांच्या हस्ते पार पडला. कार्यक्रमाचे परीक्षण सौ .अरुणा राजूरकर व आशिष मुडेवार यांनी केले.

या स्पर्धेमध्ये  महाविद्यालयातील बी कॉम तृतीय वर्षाची विद्यार्थिनी कुमारी आचल डेकाटे , द्वितीय पारितोषिक कु. स्वाती चव्हाण बी. ए. प्रथम वर्ष तर तृतीय पारितोषिक कु. अनुराधा बी. कॉम प्रथम वर्ष यांनी पटकावला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. सौ. शुभांगी भेंडे शर्मा यांनी केले तर संचालन कुमारी अलीना सय्यद यांनी केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक  वृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





Post a Comment

0 Comments