ग्रामीण सहकार शिक्षण मंडळ संस्थेचे सचिव सुभाष ताजने यांचा 50व्या वाढदिवस साजरा



ग्रामीण सहकार शिक्षण मंडळ संस्थेचे सचिव सुभाष ताजने यांचा 50व्या वाढदिवस साजरा 

बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : शहरातील महात्मा ज्योतिबा फुले   सेमी इंग्लिश विद्यालय येथे  दि. 25 ऑक्टोंबर 2023 ग्रामीण सहकार शिक्षण मंडळ चंद्रपूर संस्थेचे सचिव श्री. सुभाष विठ्ठलराव ताजने सर यांच्या 50व्या वाढदिवसा निमित्त महात्मा ज्योतिबा फुले हिंदी /उर्दू/तेलुगू/ सेमी इंग्लिश विद्यालय बल्लारपूर येथील तेलुगू माध्यम विभागात अभिष्टचिंतन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. मकसुद अहमद सर, सत्कारमूर्ती श्री. सुभाष विठ्ठलराव ताजने सर, प्रमुख अतिथी पर्येक्षक श्री. प्रकाश सर, श्री. लक्ष्मण राव सर, श्रीमती हेमलता मॅडम , श्री. रवी अन्सुरी सर उपस्थित होते, कार्यक्रमाचे संचालन श्री. वैरागडे सर यांनी केले तर आभार श्री. पेंदोर यांनी मानले. उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले .





Post a Comment

0 Comments