मुलनिवासी दिनी निमित्त निघालेल्या शोभायात्रेचे भव्य स्वागत हजरत बाबा जलाल दरबार व नुरीताज फाउंडेशन व्दारे

   









मुलनिवासी दिनी निमित्त निघालेल्या शोभायात्रेचे भव्य स्वागत हजरत बाबा जलाल दरबार व नुरीताज फाउंडेशन व्दारे


बल्लारपुर ( राज्य रिपोर्टर ) : जागतिक मुळनिवासी दिवस निमित्त संयुक्त आदिवासी समाज संघटना बल्लाळशाह जि. चांदागड च्या वतीने गोंड राजे बल्लाळशाह समाधी ते चंद्रपूर मार्गे गोंड राजे बल्लाळशाह सांस्कृतिक नाट्यगृहापर्यंत निघालेल्या आदिवासी बांधवांच्या भव्य रॅलीचे स्वागत भाजपा अल्पसंख्यक मोर्चाच्या वतीने दि. 09 ऑगस्ट रोजी नगर परिषद चौक येथे स्वागत करण्यात आले. 

यावेळी हजरत बाबा जलाल दरबार चे प्रमुख अब्दुल रहमान औरासे, नुरीताज फाउंडेशन चे संस्थापक तथा भाजपा जिल्हा अल्पसंख्यक मोर्चा चे अध्यक्ष जुम्मन रिजवी, डॉ. मासटवार, सुनिल औरासे, गिरिधर औरासे, सुधाकर मेटे, शेख हुसैन, सय्यद हमजा, शेख युसूफ, शेख अजहर, प्रशांत सातपुते, मनिश देवईकर, गणेश मोहुर्ले, प्रकाश लोखंडे, भिकु दाऊद, दादोजी क्रिष्णा भाऊ, शालिक मेढे, गुणवंत सिडाम, कोमल खांडवा, प्रतिक मोहुर्ले, गणेश मेढे यांनी सर्व धर्म समभाव राखत रॅलीतील सर्व बांधवांचे दुपट्टे व पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. किसनराव कोटनाके, विजय कुंभरे, डॉ. प्रकाश वट्टी, गिरीधर औरासे, भास्कर पेंदोर, कविता मडावी, सुधाकर कन्नाके, गुणकार जुमनाके, अल्काताई गेडाम, सुधाकर कुळसंगे, नंदु भोयर या मान्यवर समाज बांधवांचे स्वागत करुन त्यांना मुलनिवासी दिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

या प्रसंगी सर्व समाज बांधवांसाठी दोन्ही सामाजिक संस्थांच्या वतीने मसाला भात, पाणी बॉटल वितरण करण्यात आले. 





Post a Comment

0 Comments