चंद्रपूर शहरात बनावटी दारू ROYAL STAG DELUXE WHISKY, ROYAL STAG DELUXE WHISKY, OFFICER CHOICE WHISKY साठा जप्त

 



चंद्रपूर शहरात बनावटी दारू  ROYAL STAG DELUXE WHISKY, ROYAL STAG DELUXE WHISKY, OFFICER CHOICE WHISKY साठा जप्त

 ◾चंद्रपूर येथे स्थानिक गुन्हे शाखेने पकडला बनावट दारूचा साठा.


चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : चंद्रपूर शहरातील जलनगर भागातील कंजर मोहल्ला येथे स्थानिक गुन्हे शाखेने धाड टाकीत मध्यप्रदेशातील दारु आणून त्यात इतर द्रव भेसळ करून रॉयल स्टेग व ऑफिसर चॉइस या दारूच्या बॉटल चा साठा जप्त करण्यात आला असून आरोपी रवींद्र उर्फ बिट्टू कंजर पसार झाला यात 31,925 /- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.


कंजर मोहल्ल्यातील रवींद्र उर्फ बिट्टू कंजर हा मध्यप्रदेश मधील दारू महाराष्ट्रात आणून त्यात अमली व उग्रवासाचे पदार्थ मिसळवून नकली दारू बनवून ती रॉयल स्टेग (Royal Stag) बाटलीत भरून बॉटलं सील करून अवैध विक्री करीत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला प्राप्त झाली, त्याआधारे स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकला असता बिट्टू कंजर बनावटी दारू तयार करतांना आढळला पोलीसांना बघताच त्यानी पळ काढला, पोलिसांनी घराची झडती घेतली असता त्याचे घरात ROYAL STAG DELUXE WHISKY या कंपनीच्या जुन्या बॉटलचे तोडलेले बुच, ROYAL STAG DELUXE WHISKY या कंपनीच्या जुन्या बॉटल मध्ये बनावट दारू भरल्यानंतर बॉटलला लावण्या करीता वापरात येणारे नविन बनावट बुच व झाकण, बनावट दारू बॉटलींग करीता वापरण्यात येणाऱ्या ROYAL STAG DELUXE WHISKY या कंपनीच्या जुन्या 180 मिली क्षमतेच्या रिकाम्या काचेच्या बॉटल, OFFICER CHOICE WHISKY या कंपनीच्या 90 मिली क्षमतेच्या रिकाम्या केलेल्या प्लॅस्टीक बॉटल, मध्य प्रदेश शासनाचे कागदी लेबल असलेल्या OFFICER CHOICE WHISKY या कंपनीच्या 90 मिली क्षमतेच्या विदेशी दारूने भरलेल्या एकूण 295 नग प्लॉस्टीक बॉटल, ROYAL STAG DELLIXE WHISKY या कंपनीच्या जुन्या 180 मिली क्षमतेच्या बॉटलमध्ये बनावट भेसळ दारू भरून त्याला नविन झाकण व बुच लावून असलेल्या एकूण 36 नग बॉटल, जुन्या बॉटलचे बूच तोडण्या करीता वापरण्यात येणारे एक कटर, बनावट दारू बॉटल मध्ये भरण्या करीता वापरण्यात येणारी एक प्लॉस्टीक ची चाळी, दोन 5 लिटरच्या प्लॉस्टीकच्या कॅन मध्ये एकूण 10 लिटर भेसळ करण्याकरीता वापरण्यात येणारा उग्रवास येत असलेले पाण्यासारखे दिसणारे द्रव्य, एका 5 लिटरच्या कॅन मध्ये भेसळ केलेले लालसर उग्रवास येत असलेले द्रव्य असा एकुण 31,925 /- रू. चा बनावट दारू बनविण्याकरीता वापरण्यात येणारा मुद्देमाल जप्त करण्यात आला.


आरोपी रविंद्र उर्फ बिट्टु रणधीर कंजर, वय 25 वर्षे रा. कंजर मोहल्ला, जलनगर वार्ड चंद्रपूर विरूध्द पोलीस स्टेशन रामनगर अपराध क. 415 / 2023 कलम 420, 328 भादंवि सह कलम 65 (अ), 65 (ब), 65 (ड), 65 (ई), 65 (फ), 67. 67(1)(अ), 67 (क). 108 महाराष्ट्र दारूबंदी कायदा सहकलम 63 प्रतीलीपी अधिकार अधिनियम 1957 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. 

पसार झालेल्या आरोपीचा शोध सुरू असुन पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखा करीत आहे.

सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधिक्षक यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश कोंडावार, स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर यांचे नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक मंगेश भोयर, पोलीस अंमलदार संजय आतकूलवार, संतोष येलपुलवार, नितीन रायपुरे, रविंद्र पंधरे, कुंदनसिंग बावरी, गोपाल आतकुलवार, नरेश डाहुले, प्रांजल झिलपे, चंद्रशेखर आसुटकर यांनी केली.



Post a Comment

0 Comments