DNR Travel भरधाव निघालेल्या डी एन आर ट्रॅव्हल्सची ट्रकला जबर धडक; पाच जण जखमी



DNR Travel भरधाव निघालेल्या डी एन आर ट्रॅव्हल्सची ट्रकला जबर धडक; पाच जण जखमी

चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : चंद्रपूर कडून नागपूरकडे भरधाव निघालेल्या DNR Travel खाजगी ट्रॅव्हल्सने रविवारी दुपारी 2:30 च्या सुमारास वरोराकडून वणीकडे निघालेल्या ट्रकला नंदुरी येथील उडानपूल जवळ जोरदार धडक दिली. या अपघातात बस चालक आणि क्लीनर असे दोघे जण जखमी झाले तर 3 प्रवासी जखमी झाले असून या प्रकरणी पोलिसांनी बस चालकावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

चंद्रपूर येथुन  DNR Travel क्र. MH 34 BH 7577 नागपूरला निघाली होती. चंद्रपूरच्या दिशेने येणारा ट्रक क्रमांक. MH 34 AB 3840 आणी DNR Travel खाजगी ट्रॅव्हल्सची नंदोरी टोल नाक्यांजवळ  समोरासमोर धडक झाली. या अपघातात दोन्ही वाहनांच्याच समोरील भागाचे मोठे नुकसा झाले. या अपघातात  प्रतीक रविंद्र आलम, अश्विनी शंकर मेश्राम, बसचालक शुभम रमेश पोलपोलवार, अतुल ठाकरे हे प्रवाशी जखंमी झलेत. जखमी झाले त्यांना वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले.

 वरोरा पोलिसांना घटनेची माहिती मिळतच पोलिसांनी घटनास्थळ गाठले. नागपूरकडे जाणाऱ्या बसेने उडाणपूलावरून जायचे होते परंतु तसे ना करता बस चालकाने उड्डाणपूलाखालून भरधाव वेगाने बस आणली आणि त्याच दरम्यान वरोऱ्याकडून उडान पुलाच्या कालून वनी मार्गे जाणाऱ्या ट्रकला जोरदार धडक दिली. 

वरोरा पोलिसांनी घटनेची नोंद घेतली आणि बस चालकावर कलम 279 व 337 नुसार गुन्हा दाखल केला आहे. घटनेची पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहेत.



Post a Comment

0 Comments