वर्धा जिल्हातील व्यवसाय शिक्षकांच्या अडचणी व मागण्या

 


वर्धा जिल्हातील व्यवसाय शिक्षकांच्या अडचणी व  मागण्या  

◾जिल्हा परिषद शिक्षण विभाग वर्धा, जिल्हाधिकरी वर्धा  यांना दिले निवेदन


वर्धा ( राज्य रिपोर्टर ) : वर्धा जिल्हा व्यवसाय शिक्षक संघटनेच्या वतीने मा.उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे व शिक्षणाधिकारी श्री.सचिन जगताप साहेब यांना केंद शासनाच्या माध्यमिक उच्य माध्यमिक व्यवसाय शिक्षण योजनेअंतर्गत जिल्ह्यातील व्यवसाय शिक्षकांच्या मागण्या बाबतीत निवेदन देण्यात आले त्यामध्ये व्यवसाय शिक्षकांना एकूण बारा महिन्याचे नियुक्ती आदेश,सदर योजनेतील व्यवसाय प्रशिक्षण संस्था व लेड हॅन्ड इंडिया यासारख्या एनिजो यामधून रद्द करून हे योजना समग्र शिक्षा कार्यालय,मुंबई मार्फत राबविण्यात यावी. 

महिला शिक्षकांना प्रसुती रजा देण्यात याव्यात तसेच विद्यार्थ्यांना कौशल्यभिमुख   करण्यात येनार्या योजनेला चांगल्या पद्धतीने राबविण्यात यावे.

नवीन सत्रात व्यवसाय शिक्षकांना सुरवातीला नियुक्ती मीळावी.इत्यादी विषय माडण्यात आले.यावेळी वर्धा जिल्हा व्यवसाय शिक्षक संघटनेचे  अध्यक्ष त्रिरत्न नागदेवे , उपाध्यक्षक्ष  पंकज कावळे ,जिल्हा सचिव सचिन मून ,कोषाध्यक्ष हेमराज चौधरि,सम्पर्क प्रमुख सुमित तलमले, हर्षल बोधनकर , जिल्हा सल्हागार जाफर कुरेशी,जिल्हा संघटक शशिकांत गाडगिने, इत्यादिनी यशस्वितेसाठी अथक परिश्रम घेतले.



Post a Comment

0 Comments