चिमूर विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार बाबुराव वाघमारे यांचे निधन

 


चिमूर विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार बाबुराव वाघमारे यांचे निधन

चंद्रपूर (राज्य रिपोर्टर): चिमूर विधानसभा क्षेत्राचे शिंदेवाही तालुक्यातील मोहाडी, नालेश्वर येथील, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार बाबुराव जसुजी वाघमारे यांचे रविवारी 23 एप्रिल 2023 ला रात्री 8 वाजताच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 74 वर्षाचे होते.

सोमवारी मोहळी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांचे पश्चात बराच मोठा परिवार आहे. त्यांनी सण  1990 ते 95 सालात चिमूर विधानसभा क्षेत्राकरिता निवडणूक लढवली होती. त्यामध्ये ते प्रचंड मताधिक्याने निवडून आले. या विधानसभा क्षेत्राचे पांच वर्ष त्यांनी नेतृत्व केले. या कालावधी त्यांनी क्षेत्रात विविध विकास कामे केली. उत्कृष्ट आमदार म्हणून त्याला गौरविण्यात आलेले आहे.



Post a Comment

0 Comments