बल्लारपुरात अत्याधुनिक व्यायाम साहित्याचा लोकार्पण कार्यक्रम

 


बल्लारपुरात अत्याधुनिक व्यायाम साहित्याचा लोकार्पण  कार्यक्रम  सोहळा

◾डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पर्वावर, नालंदा क्रीडा मंडळ बल्लारपूर द्वरा संचालित  व्यायाम साहित्याचा लोकार्पण सोहळा 

◾वन, सांस्कृतिक व मत्स्यव्यवसाय मंत्री ना. सुधिरभाऊ मुनगंटीवार यांच्या विशेष प्रयत्नातून 

बल्लारपूर  ( राज्य रिपोर्टर ) : युगपुरुष, महामानव अशी बिरुदावली लाभलेले प्रसंगी वर्गाच्या बाहेर शिक्षण घेवून या देशाचा भूतकाळच नव्हे तर वर्तमान व भविष्य बदलविणारे महामानव, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती या निमित्तानं विकासपुरुष व महाराष्ट्राचे वन, सांस्कृतिक व मत्स्यव्यवसाय मंत्री ना. सुधिरभाऊ मुनगंटीवार यांच्या विशेष प्रयत्नातून वैशिष्टयपुर्ण निधी अंतर्गत प्राप्त झालेल्या अत्याधुनिक व्यायाम साहित्याच्या लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. बल्लारपूर शहरातील नालंदा क्रीडा मंडळ द्वारा संचालित संस्कार व्यायाम शाळेत डॉ. झाकीर हुसेन वार्ड, संत तुकाराम महाराज सभागृह समोर या अत्याधुनिक व्यायाम साहित्याचं लोकार्पण 14 एप्रिल 2023 ला सायंकाळी 6:00 वाजता संपन्न होत आहे या कार्यक्रमाचे विशेष अतिथी मा. चंदनसिह चंदेल ज्येष्ठ भाजप नेते बल्लारपूर असणार आहेत तरी या कार्यक्रमात उपस्थित राहण्याचे आवाहन मा. समीर केने व मा. मनीष पांडे यांनी केल आहे.




Post a Comment

0 Comments