जुमदेवबाबांच्या भव्य शोभायात्रेने दुमदुमले बेला

 





जुमदेवबाबांच्या  भव्य शोभायात्रेने दुमदुमले बेला    

बेला ( राज्य रिपोर्टर ) विनोदकुमार डांगरे  : मानवधर्माचे संस्थापक महानत्यागी बाबा जुमदेवजी यांच्या 102 व्या जयंती यानिमित्ताने शाखेचे मार्गदर्शक दिलीप शेंडे गुरुजी यांच्या नेतृत्वात बेला येथील बसस्थानकापर्यंत जल्लोषात भव्य शोभायात्रा काढण्यात आली.    नागपुरातील टिमकी येथील उगम स्थानापासून वर्धमान नगर पर्यंत परमात्मा एक सेवकांची विशाल रॅली काढून जुमदेव बाबांचा जन्मोत्सव उत्साहात साजरा झाला . तेथे जाण्यासाठी बेला परिसरातील रामा, शेडेश्वर ,आष्टा, चारगाव ,वडगाव, सालईराणी, मुरादपूर ,कोहळा दहेली सावंगी ,खुरसापार,कवडापूर, सिरसी, गिरड व बुटीबोरी भागातील 500 पेक्षा जास्त सेवक बेला येथील मार्गदर्शक दिलीप शेंडे यांचे घरी जमले होते. तेथून डीजेच्या तालावर वाजत गाजत भव्य शोभायात्रा काढण्यात आली. उत्साहातील नयनरम्य शोभायात्रेने बेलानगरी अक्षरशः दुमदुमून गेली होती. शोभा यात्रेच्या यशस्वीतेसाठी परमात्मा सेवक मंडळाचे बापूराव हिंगे, पंढरी बालपांडे, सुरेंद्र गंधारे, मारोती माकडे,सुरेश तेलरांध्ये,पांडुरंग धांडे, रामदास बावणे, भास्कर डायरे,महादेव बेले, सुखदेव बालपांडे, प्रभु मोते, गजू बालपांडे, दामू चन्ने, दुमन तेलरांधे, व खेड्यापाड्यातील असंख्य कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.



Post a Comment

0 Comments