वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून चंद्रपुर जिल्ह्यातील 240 दिव्यांगांना ताडोबा दर्शन

 









वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून चंद्रपुर जिल्ह्यातील 240  दिव्यांगांना ताडोबा दर्शन

◾ताडोबा सफारीचा मिळाला 240 दिव्यांग बांधवांना लाभ

◾दिव्‍यांग बांधवांनी मानले सुधीर मुनगंटीवार यांचे आभार


चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : जगप्रसिध्‍द ताडोबा व्‍याघ्र प्र‍कल्‍प बघण्‍यासाठी देशविदेशातील पर्यटक येतात. ताडोबाचे प्राणी, वनवैभव व जैवविविधता जगप्रसिद्ध आहे. देशातील सर्वाधिक वाघ ताडोबा-अंधारी व्‍याघ्र प्रकल्‍पात आहे. त्‍यामुळे हमखास व्‍याघ्र दर्शनासाठी ताडोबा व्‍याघ्र प्रकल्‍पामध्‍ये पर्यटन केले जाते. याच पर्यटनाचा लाभ चंद्रपूर जिल्ह्यातील 240 दिव्यांग बांधवांनी घेतला.


ताडोबा व्‍याघ्र प्रकल्‍प बघता यावा, अशी इच्‍छा विकलांग एकता शक्‍ती संघटना बल्‍लारपूर जि. चंद्रपूर येथील दिव्‍यांग बांधवांनी राज्‍याचे वन, सांस्‍कृतिक कार्य व मत्‍स्‍य व्‍यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांचेकडे व्‍यक्‍त केली होती. ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबत ताडोबा-अंधारीच्या अधिकाऱ्यांना सूचना करीत दिव्यांगांना ताडोबा सफर घडवावी असे सांगितले. त्यानुसार 2  ते 7  एप्रिल 2023 पर्यंत टप्याटप्याने चंद्रपूर जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांनी वन पर्यटनाचा लाभ घेतला.यावेळी दिव्यांगासोबत पालकांनी ताडोबा सफारी केली.

बल्‍लारपूर येथील विकलांग एकता शक्‍ती संघटनेच्‍या माध्यमातून 240  दिव्‍यांग बांधवांची आणि त्यांच्या पालकांनी ताडोबा भ्रमंती केली . दिव्‍यांग बांधवांनी ताडोबातील पशू-पक्षी, विविध वृक्ष, विविध प्राणी, ताडोबातील जैवविविधतेचा मनसोक्‍त आनंद लुटला. श्री. सुधीर मुनगंटीवार व वनविभागाच्‍या माध्‍यमातून हे पर्यटन दर्शन घडविण्‍यात आले. यावेळी वन मार्गदर्शकांनी ताडोबा व्‍याघ्र प्रकल्‍पाविषयी संपूर्ण माहिती देऊन ताडोबा पर्यटनाचे महत्‍व अधोरेखित केले. यावेळी दिव्‍यांग बांधवांच्‍या चेहऱ्यावरचे हसू आणि समाधान बघण्‍यासारखे होते. यावेळी दिव्‍यांग बांधवांना खाद्य किट्सचे वाटप करण्यात आले.

यावेळी भाजपा महानगर चंद्रपूरचे कोषाध्‍यक्ष प्रकाश धारणे व वनाधिकारी यांच्‍या माध्‍यमातून ताडोबा व्‍याघ्र प्रकल्‍प दाखविण्‍यात आला. यावेळी दिव्‍यांग बांधवांनी ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांचे आभार व्यक्त केले.




Post a Comment

0 Comments