घरगुती वादात हात पाय बांधून (रेजर) ब्लेड ने गळा कापून हत्या



घरगुती वादात हात पाय बांधून (रेजर) ब्लेड ने गळा कापून हत्या

बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : कौटुंबिक कलहातून उच्चशिक्षित तरुणीने आपल्या मावशीच्या नवऱ्याची गळा चिरडून निघृ॔ण  हत्या केल्याची खळबळजनक घटना बल्लारपूर शहरातील दादाभाई नवरोजी वार्ड येथे घडली घटनेनंतर स्वतः आरोपी युवतीने पोलीस ठाण्यात जाऊन गुन्ह्याची कबुली दिली. विशाल काशिनाथ दासरवार वय 46 वर्ष असे मृतक व्यक्तीचे नाव असून शिवानी अजय बोधनवार 24 वर्ष असे आरोपी तरुणीचे नाव आहे.

बल्लारपूर शहरातील दादाभाई नवरोजी वार्ड येथे शामराव कोंडुरवार यांना तीन मुले त्यापैकी दोन्ही मुलींचे कुटुंब त्यांच्याच घरी राहतात त्यापैकी एक जावई मृतक विशाल दासरवार व दुसरा जवई आरोपी शिवानीचे वडील अजय बोधनवार, शामराव कोंडुरवार यांच्या मृत्यूनंतर घराच्या वाटपावरून नेहमी वाद होत असत, मृताक विशाल दासरवार हा दारूच्या व्यसनात नेहमी सासू सोबत प्रॉपर्टी वरून वाद करायाचा यावरून असे कृत्य घडले असावे अशी स्थानिक चर्चा आहे.

दिनांक. 22 एप्रिल शनिवार  रोजी पहाटे 2 वाजताच्या सुमारास विशाल दासरवार यांची झोपेतच गळा गावळून हत्या करण्यात आली. कौटुंबिक वादाला कंटाळून एमबीए ( MBA ) झालेल्या शिवानी बोधनवार ने हा खून केल्याची पोलीस ठाण्यात कबुली दिली.अप क्र. 376 / 2023 कलम 302, भादवी तपासास चालु. 

या गुन्हयात शिवानी सह अन्य दोन व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास बल्लारपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सापोनि. रमेश हत्तीगोटे करीत आहे.




Post a Comment

0 Comments