मोहफूल वेचायला गेला आणि वाघाच्या हल्ल्यात ठरला बळी

 





मोहफूल वेचायला गेला आणि वाघाच्या हल्ल्यात  ठरला बळी

चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) :  जिल्ह्यातील नागभीड वनपरिक्षेत्रातील कक्ष क्रमांक. 605 येथे मोहफुलं वेचण्यासाठी गेलेल्या इसमावर दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला चढवला यात त्याचा जागीच मृत्यू झाला.

अरुण महादेव रंधये वय 55 वर्ष असे वाघाच्या हल्ल्यात मृत पावलेल्या इसमाचे नाव आहे.

4 एप्रिल मंगळवारी नागभीड वनपरिक्षेत्रातील कक्ष क्रमांक 605 मध्ये अरुण रंधये मोहफुलं वेचण्यासाठी गेला, मोहफुलं वेचत असतांना वाघाने अचानक हल्ला करीत अरुण रंधये याला जागीच ठार केले.

संध्याकाळी अरुण घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शोध घेण्यास सुरुवात केली असता जंगलात अरुनचा मृतदेहच आढळला.

 वनविभागाला माहिती दिली असता वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील हजारे यांनी ताफ्यासह घटनास्थळ गाठून पंचनामा केला आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला.

ग्रामीण भागात उन्हाळ्यात मोहफुलं व तेंदूपत्ता हा मुख्य व्यवसाय असतो, याकरीता ग्रामस्थ मोहफुलं व तेंदू पण संकलन करण्यासाठी जंगलात जातात अशातच वाघांच्या हल्ल्यांचे प्रमाण वाढतच आहे मात्र याकाळात मानव वन्यजीव संघर्ष वाढणार याची शक्यता नाकारता येणार नाही.



Post a Comment

0 Comments