प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्सहात साजरी

 



प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्सहात साजरी

लातूर ( राज्य रिपोर्टर ) : भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य जिल्हा शाखा लातूरच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या राज्य महिला अध्यक्षा डॉ. सुधाताई कांबळे, राज्य उपाध्यक्ष अजय सुर्यवंशी, लातूर जिल्हाध्यक्ष लहुकुमार शिंदे, माहिला अध्यक्षा वैशाली पाटील, जिल्हा उपाध्यक्ष महादेव पोलदासे, नितीन चाळक जगदेवी कांबळे, दत्ता धुमाळ आदी पदाधिकारी व पत्रकार उपस्थित होते.

ज्या महामानवाने या जगावर विचाराने, कार्याने, कर्तृत्वाने राज्य केले व समाजाला ताठ मानेने जगायला शिकवले, शिक्षणाचे महत्व समजावले, अन्यायाविरुद्ध लढायला शिकवले, सर्वांना एकसमान समजले, स्वातंत्र्य, समता व बंधुत्वाचा नारा देत आनंदाने जगायला शिकवले अशा महामानवाचे कार्य कोणीही विसरू शकत नाही असे जिल्हाध्यक्ष लहुकुमर शिंदे यांनी प्रतिपादन केले. राज्य महिला अध्यक्षा डॉ. सुधाताई कांबळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक, शैक्षणिक, पत्रकारिता, साहित्य आदी विषयावर प्रकाश टाकला. जिल्हा महिला अध्यक्षा वैशालीताई पाटील यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे महिलाविषयक कार्य याबद्दल आपले विचार व्यक्त केले. अजय सुर्यवंशी यांनी तळागाळातील माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मिळवून दिला असे सांगितले. तर महादेव पोलदासे आणि इतर पदाधिकाऱ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आपले विचार व्यक्त केले.




Post a Comment

0 Comments