कर्नाटक विधानसभेच्या निवडणूक प्रचारार्थ दोन दिवसीय कर्नाटक दौऱ्यावर - वन, सांस्कृतिक मंत्री ना. सुधीर मुनगंटीवार



कर्नाटक विधानसभेच्या निवडणूक प्रचारार्थ  दोन दिवसीय कर्नाटक दौऱ्यावर - वन, सांस्कृतिक मंत्री ना. सुधीर मुनगंटीवार 

 ◾कर्नाटक दौऱ्यावर देवर हिप्परगी मतदार संघात प्रचार, जनसंपर्क दौरा

मुंबई ( राज्य रिपोर्टर ) : राज्याचे वन, सांस्कृतिक आणि मत्स्यव्यवसाय मंत्री ना. सुधीर मुनगंटीवार बुधवारपासून विधानसभा निवडणूक प्रचारार्थ  दोन दिवसीय कर्नाटक दौऱ्यावर जात आहेत. पक्षाच्या निर्देशानुसार विजयपूर जिल्ह्यातील देवर हिप्परगी या मतदारसंघात ते दोन दिवस प्रचार करणार आहेत.

कर्नाटक विधानसभेच्या २२४ जागांसाठी येत्या १० में रोजी मतदान होणार आहे. विजयपूर जिल्ह्यातील देवर हिप्परगी विधानसभा मतदार संघाचे भाजपा उमेदवार श्री सोमानगौडा पाटील यांच्या प्रचारासाठी ना. मुनगंटीवार सकाळी ११ वाजता विजयपूर येथे दाखल होतील. स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर  तेथून देवर हिप्परगी कडे रवाना होतील. 

भाजपा उमेदवार श्री. सोमानगौडा पाटील यांची भेट घेऊन ते चर्चा करतील. त्यानंतर स्थानिक भाजप आणि भारतीय जनता युवा मोर्चा पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह मतदार संघात विविध गावांमध्ये बैठका आणि जनसंपर्क अभियानात ते सहभागी होणार आहेत.

या दौऱ्यात जाहिर सभां सोबतच घरोघरी संपर्क, विविध समाजघटकांशी चर्चा व संपर्क, विविध व्यावसायिक घटकांशी संपर्क, बूथप्रमुख बैठका, भाजपा पक्षांतर्गत विविध सेलच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा अशा संघटनात्मक बाबींवरही जोर देण्यात आला आहे. 

या दौऱ्यात ना. मुनगंटीवार यांच्यासोबत स्वतः उमेदवार श्री.सोमनगौडा पाटील यांच्यासह उत्तर प्रदेश चे माजी मंत्री व मतदारसंघ प्रभारी श्री. आनंद स्वरूप शुक्ला, मतदारसंघ निवडणुक प्रभारी अनिल जमादार, मंडल अध्यक्ष भीमणगौडा सिद्दार्थ,  प्रभू गौडा बिरासदार , जिल्हा परिषद सदस्य सिद्दार्थ बुला आदी सहभागी होणार आहेत.

Post a Comment

0 Comments