भोयर पॅनल तिसऱ्यांदा विजयी, तेराही उमेदवार जिंकले !

 





भोयर पॅनल तिसऱ्यांदा विजयी, तेराही उमेदवार जिंकले !

 बेला ( राज्य रिपोर्टर )  विनोदकुमार डांगरे : शनिवारी पार पडलेल्या बेला येथील सेवा सहकारी संस्थेच्या निवडणुकीत उमरेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती ज्ञानेश्वर भोयर यांच्या शेतकरी सहकार पॅनलने तिसऱ्यांदा विजय मिळवून विजयाची 'हॅट्रिक 'साधली. त्यांच्या तेराही उमेदवारांचा दणदणीत विजय झाला. निकालानंतर रात्री उशिरा ढोल ताशाचे निनादात व गुलाल उडवत जल्लोषात रॅली काढून कार्यकर्त्यांनी उत्साहात विजय साजरा केला.

   गेल्या दोन पंचवार्षिक निवडणुकीत ज्ञानेश्वर भोयर यांची बेला येथील सोसायटीवर अबाधित सत्ता होती. यंदा त्यांना शह देण्यासाठी सरपंच अरुण बालपांडे यांनी त्यांचे विरोधात पहिल्यांदाच पॅनेल उभे केले होते. परंतु त्यांचे सर्व उमेदवारांचा पराभव झाला. व तिसऱ्यांदा ज्ञानेश्वर भोयर यांच्या पॅनेलने सर्व 13 जागांवर विजय मिळवत हॅट्रिक साधली.    विजयी उमेदवारांमध्ये सर्वसाधारण कर्जदार गटातून स्वतः ज्ञानेश्वर भोयर ,माजी अध्यक्ष ज्योतीकुमार देशमुख, माजी अध्यक्ष वासुदेव कांबळे, रमेश परसराम भोयर, नारायण गवळी, महादेव आमनेरकर ,रमेश रोडे चांगदेव खडसे व विष्णू सोयाम, महिला राखीव गटातून मीना नामदेव उमाटे व विजया फुलचंद उगेमुगे, भटक्या विमुक्त जाती जमाती मधून दिलीप जनार्दन झिले, अनुसूचित जाती जमाती मधून वासुदेव कांबळे व इतर मागास प्रवर्गातून अनिल उर्फ बबलू तीमांडे यांचा समावेश आहे. भोयर यांना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपच्या अनेक नेत्यांचे सहकार्य लाभले होते. सभा घेऊन विजयाची सांगता झाली.



Post a Comment

0 Comments