बल्लारपूर शहरातील बहुतांश सार्वजनिक स्वच्छतागृहाची दैनावस्था

 


बल्लारपूर शहरातील बहुतांश सार्वजनिक स्वच्छतागृहाची दैनावस्था

◾अनेक शौचालयातील दरवाजे तुटलेल्या अवस्थेत असल्याने महिला वर्ग तेथे शौचास जाणे टाळतांना दिसते.

◾अनेक शौचालयात पाण्याची सोय नहीं. 

◾स्वच्छता व्यवस्थाही ढासळली.


बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : शासनाच्या विविध निधीतून मांडण्यात आलेले शहरातील बहुतांश सार्वजनिक शौचालय व स्वच्छताग्रहांची दैनास्थिती तसेच स्वच्छतेचा अभाव असल्यामुळे शहरात पुन्हा एकदा लोटा  परेड पाहायला मिळत आहे. 


बल्लारपूर शहरातील मौलाना आझाद वार्ड आणि रवींद्र नगर वार्ड याला लागून असलेल्या कारवा जंगलाला लागून असलेल्या  रोडवरील स्वच्छतागृहात पाण्याची कोणतीही व्यवस्था नसल्याने नागरीकांना पुन्हा एकदा हाती लोटे घेऊन जंगलात शौचास जावे लागत आहे. शहरातील मुख्य मार्गावरील अनेक शौचालयातील दरवाजे तुटलेल्या अवस्थेत असल्याने महिला वर्ग तेथे शौचास जाणे टाळतांना दिसते आहे. अनेक शौचालयात पाण्याची सोय नसल्याने परिसरातील नागरिकांना या स्वच्छतागृहात जाताना पाणी आपल्या सोबत घेऊन जावे लागत आहे. वॉश बेसिन मधल्या नळाला पाणी नसल्याचे दिसते. तसेच पाण्याचे टाके खाली अवस्थेमध्ये  आहे.नगरपरिषद  मोठमोठ्या गोष्टी सांगून पुरस्कार मिळवते आणि याकडे अक्षम्य दुर्लक्ष का? असा प्रश्न परिसरातील नागरिकांसमोर पडला आहे.


[ बल्लारपूर मुख्याधिकारी वाघ यांनी कार्यभार सांभाळला तेव्हा पासून शहरातील स्वच्छतेला जणू ग्रहण लागले म्हणायला हरकत नाही! शहरातील स्वच्छता पूर्णतः ढासळली आहे. अनेक वार्डात स्वच्छतेचा अभाव दिसत असून ज्या ठेकेदारांला हे काम देण्यात आले आहे त्याच्या समोर अधिकारी वर्गाने शरणागती पत्करली कि मग त्याच्या कर्जाखाली सर्व हतबल झाले आहे असा प्रश्न नागरीकांना पडला आहे असे असतांनाही न. प. मधिल अनेक कंत्राट त्याला व त्याच्या सहवास्यांनाच मिळत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यात अधिकाऱ्यांचा वाटा मोठा प्रमाणात असण्याची शक्यताही नागरिक वर्तवित आहे. 

कारण अद्यापही त्याच्यावर कोणतीही कार्यवाही तथा त्याच्या  कामात कोणता अडथळा निर्माण झाला असे पहावयास मिळाले नाही. ]

Post a Comment

0 Comments