घुग्घूस नगरपरिषद येथे तिसरा महिना सुरू असून अजून ही कामगारांना वेतन नाही.



घुग्घूस नगरपरिषद येथे तिसरा महिना सुरू असून अजून ही कामगारांना वेतन नाही.

◾शोकांतिका! शहर स्वच्छ करणाऱ्यावर उपासमारीची वेळ ?

 घुग्घूस ( राज्य रिपोर्टर )  : पन्नास हजार लोकसंख्येच्या शहराची स्वच्छतेची जवाबदारी ज्या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर आहे. आज त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली आहे.उन्हाचा पारा कडक्याने वाढला आहे.

या रखरखत्या उन्हात घुग्घुस नगरपरिषदेचे अनेक कर्मचारी रिकामे डबे घेऊन कामावर येत आहे.आणि उपाशी पोटीच काम करीत आहे. महागाई आभाळाला टेकली आहे. मिळणाऱ्या तुटपुंज्या पगारात कसे - बसे चटणी भाकरची व्यवस्था होत होती. मात्र नगरपरिषदेच्या गलथानपणे मुळे तिसरा महिना सुरू असून अजून ही कामगारांना वेतन मिळालेला नाही. आणि अजून दहा ते पंधरा दिवस मिळणार ही नसल्याचे कळल्याने अनेक कामगारांच्या डोळ्यात भर उन्हाळ्यात आलेले पाणी हे कुटुंबाची व्यथा सांगून जाते.

मात्र निष्ठुर व्यवस्थेला काय फरक पडणार आहे. तरी ही मानवी दृष्टी कोनातून शक्य तितक्या लवकर या कामगारांच्या वेतनाचा प्रश्न निकाली काढावा ही विनंती.



Post a Comment

0 Comments